IPL 2021 : राजस्थानने बिघडवलं मुंबईचं गणित, गतविजेत्यांचं प्ले-ऑफमधलं आव्हान जवळपास संपुष्टात

मुंबई तक

• 05:53 PM • 07 Oct 2021

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या स्पर्धेतलं आव्हान आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानचा दारुण पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठीचं गणित आता खूप कठीण झालेलं आहे. १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ८५ धावांत गारद झाला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात आता १४ गुण […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या स्पर्धेतलं आव्हान आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानचा दारुण पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठीचं गणित आता खूप कठीण झालेलं आहे.

हे वाचलं का?

१७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ८५ धावांत गारद झाला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात आता १४ गुण झाले असून महत्वाची गोष्ट म्हणझे त्यांच्या रनरेटमध्येही वाढ झाली असून तो + 0.58 एवढा झाला आहे. मुंबई इंडियन्ससाठी राजस्थानने आजचा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतू याऊलट राजस्थानचा आजच्या सामन्यात दारुण पराभव झाल्यामुळए मुंबईच्या आशांवर आता जवळपास पाणी फिरलेलं आहे.

मुंबई इंडियन्स उद्या आपला अखेरचा साखळी सामना सनराईजर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. या सामन्यात त्यांना हैदराबादवर किमान १७१ रन्सनी विजय मिळवावा लागेल. आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या विजय हा १४५ धावांनी मिळवला गेला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचं आव्हान आता जवळपास संपल्यात जमा असून कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर कायम राहिलं असं दिसतंय.

IPL 2021 : भर मैदानात प्रपोज; कोण आहे दीपक चहरची गर्लफ्रेंड? जाणून घ्या…

याचसोबत शुक्रवारी होणाऱ्या RCB vs DC या सामन्यातही RCB ने दिल्लीवर १६३ रन्सच्या फरकाने मात केली तर ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. पहिल्या दोन स्थानांवर असलेला संघाला प्ले-ऑफमध्ये चांगली संधी मिळते. जिंकलेला संघ हा थेट अंतिम फेरीत जातो तर पराभूत झालेला संघ हा तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील विजेत्या संघाशी खेळतो. त्यामुळे शुक्रवारी होणारे दोन्ही सामने हे महत्वाचे मानले जात आहेत.

दरम्यान राजस्थानने आपल्या अखेरच्या सामन्यात निराशाजनक खेळ केला. संघात ४ बदल करत त्यांनी संघाची घडी विस्कटून टाकली. KKR ने १७१ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर राजस्थानचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत राहिल्यामुळे राजस्थानची अवस्था एका क्षणाला ७ बाद ३५ अशी झाली होती. यानंतर राहुल तेवतियाने मधल्या फळीत फटकेबाजी करत ४४ धावांची खेळी केली. परंतू त्याचेही प्रयत्न तोकडेच पडले.

दिल्ली कॅपिटल्सचा एक उनाड दिवस

    follow whatsapp