IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या चेतन साकरियाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

मुंबई तक

• 08:24 AM • 09 May 2021

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा युवा फास्ट बॉलर चेतन साकरियावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतनच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटने या बातमीला दुजोरा दिला आहे. ही खूप वाईट बातमी आहे आणि या खडतर काळात सर्व खेळाडू आणि मॅनेजमेंट चेतनच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं राजस्थानच्या संघातील […]

Mumbai Tak
Google CTA

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा युवा फास्ट बॉलर चेतन साकरियावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतनच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटने या बातमीला दुजोरा दिला आहे. ही खूप वाईट बातमी आहे आणि या खडतर काळात सर्व खेळाडू आणि मॅनेजमेंट चेतनच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं राजस्थानच्या संघातील एका सूत्राने सांगितलं.

हे वाचलं का?

IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत

आयपीएल २०२१ च्या हंगामात चेतनने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत ७ विकेट घेतल्या होत्या. याआधीही चेतनने अशाच पद्धतीने एक धक्का पचवला होता. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत असताना चेतनच्या भावाचं अपघाती निधन झालं. परंतू त्याच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी परिवाराने ही गोष्ट त्यावेळी त्याला कळू दिली नव्हती. या धक्क्यातून सावरत चेतनने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. परंतू खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा मध्यावधीत स्थगित केली. ज्यानंतर चेतनला आणखी एक धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीच्या आई आणि बहिणीचंही कोरोनामुळे निधन झालं. एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना आयपीएलचे सामने खेळवण्याची गरज होती का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी विचारला जात होता. ज्यानंतर आयपीएलमध्ये बायो सिक्युअर बबल मोडल्याची घटना घडली ज्यामुळे अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेत बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली आहे.