ADVERTISEMENT
बुधवारी क्रिकेटप्रेमींना रोमांचक आणि अविस्मरणीय सामना बघायला मिळाला. आयपीएल स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्या सामना झाला.
या सामन्यात राहुल तेवतिया आणि राशिद खानने पुन्हा एकदा आपल्या खेळीनं मनं जिंकली. दोघांनी निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.
गुजरात टायटन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावांची गरज होती. मोक्याच्या वेळी राशिद खान आणि राहुल तेवतिया या जोडीने वादळी खेळी करत ६ चेंडूत २५ धावा फटकावल्या.
शेवटच्या षटकात थरार कसा रंगला याबद्दल सांगायचं म्हणजे गुजरात टायटन्सला विजयासाठी १२ चेंडूत ३५ धावांची गरज होती.
१९व्या षटकात १३ धावाच गुजरात टायटन्सला करता आल्या. त्यामुळे २०व्या षटकात सगळ्यांचाच श्वास रोखला गेला.
राहुल तेवतियाने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राहुल तेवतियाने एक धाव काढली.
त्यानंतर राशिद खानने सामन्याचा निकालच बदलून टाकला. राशिद खानने षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला.
ADVERTISEMENT
