IPL 2022 : लय गमावून बसलेल्या CSK मध्ये मोठा बदल, जाडेजाने कॅप्टन्सी पुन्हा धोनीकडे सोपवली

मुंबई तक

• 02:12 PM • 30 Apr 2022

आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी अत्यंत निराशाजनक गेला आहे. एकीकडे मुंबईने आपले पहिले 8 सामने गमावल्यामुळे त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. दुसरीकडे गतविजेता चेन्नईचा संघही आतापर्यंत फक्त दोन सामन्यांत जिंकू शकलेला असल्यामुळे बाद फेरीत दाखल होण्यासाठी त्यांच्यासमोर रस्ता खडतर झाला आहे. त्यामुळे हातातून निसटत चाललेला हंगाम पाहता आपलं […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी अत्यंत निराशाजनक गेला आहे. एकीकडे मुंबईने आपले पहिले 8 सामने गमावल्यामुळे त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. दुसरीकडे गतविजेता चेन्नईचा संघही आतापर्यंत फक्त दोन सामन्यांत जिंकू शकलेला असल्यामुळे बाद फेरीत दाखल होण्यासाठी त्यांच्यासमोर रस्ता खडतर झाला आहे. त्यामुळे हातातून निसटत चाललेला हंगाम पाहता आपलं आव्हान टिकावं म्हणून CSK ने संघात मोठे बदल केले आहेत.

हे वाचलं का?

हंगामाच्या सुरुवातीला संघाचं नेतृत्व करणाऱ्या रविंद्र जाडेजाने आपली जबाबदारी पुन्हा एकदा धोनीकडे सोपवली आहे. धोनीनेही ही जबाबदारी घेण्याचं मान्य केल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलं आहे.

यंदाचा हंगाम सुरु व्हायच्या आधीच धोनीने आपण यंदा नेतृत्व करणार नसल्याचं सांगत जाडेजाकडे जबाबदारी सोपवली. परंतू यंदाच्या हंगामात जाडेजाच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नईला जराही लय सापडली नाही. केवळ 2 विजयांसह चेन्नईचा संघ पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये संघाला चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा आपल्या अनुभवी खेळाडूवर विश्वास टाकायचं ठरवलं आहे.

रविंद्र जाडेजा हा संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. परंतू यंदाच्या हंगामात कॅप्टन्सीच्या दबावामुळे जाडेजाचा खेळ म्हणावा तसा खुलून आला नाही. अनेक सामन्यांमध्ये चेन्नईला हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावं लागलं. कॅप्टन्सीच्या जबाबदारीचा परिणाम आपल्या खेळावर होत असल्यामुळे, खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जाडेजाने आपली जबाबदारी पुन्हा धोनीकडे सोपवली आहे. त्यामुळे उर्वरित हंगामात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp