IPL 2022 : विराट कोहली शून्यावर आऊट, सोशल मीडियावर क्रिकेट फॅन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर

मुंबई तक

• 02:48 PM • 23 Apr 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा पुन्हा एकदा चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीअमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध खेळत असताना विराट कोहली पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाला. एकाच हंगामात दोनवेळा शून्यावर आऊट होण्याची कोहलीसाठीची ही पहिलीच वेळ ठरली. यंदाच्या हंगामात लखनऊ विरुद्ध सामन्यात चमीराने विराटला शून्यावर आऊट केलं. हैदराबादविरुद्धच्या […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा पुन्हा एकदा चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीअमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध खेळत असताना विराट कोहली पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाला.

हे वाचलं का?

एकाच हंगामात दोनवेळा शून्यावर आऊट होण्याची कोहलीसाठीची ही पहिलीच वेळ ठरली. यंदाच्या हंगामात लखनऊ विरुद्ध सामन्यात चमीराने विराटला शून्यावर आऊट केलं. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सनने विराटला एडन मार्क्रमकरवी आऊट केलं.

विराट माघारी परतताच मैदानावर उपस्थित चाहत्यांमध्ये शांतता पसरली होती. दरम्यान विराट स्वस्तात माघारी परतल्यानंतर सोशल मीडियावरही फॅन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर आल्याचं पहायला मिळालं.

विराट कोहलीला अशा पद्धतीने मैदानावर पाहणं त्याच्या फॅन्ससाठी खूप कठीण जात आहे.

विराट कोहलीच्या खराब कामगिरीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे.

सनराईजर्स हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत हैदराबादच्या बॉलर्सची धडाकेबाज सुरुवात करत RCB ची आघाडीची फळी कापून काढली. जेन्सनने फाफ डु-प्लेसिस, विराट कोहली, अनुज रावत या आघाडीच्या फळीला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने सूयश प्रभूदेसाईच्या सहाय्याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू टी. नटराजनने मॅक्सवेलला आऊट करत RCB ला बॅकफूटला ढकललं.

विराट कोहलीला विश्रांतीची गरज आहे – माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्वाचं विधान

    follow whatsapp