आरारा... 'RCB चा पराभव झाला तर मी नवऱ्याला घटस्फोट देणार', महिलेचा VIDEO तुफान व्हायरल

IPL Viral Video : जर आरसीबी आयपीएल जिंकली नाहीतर मी नवऱ्याला घटस्फोट देईल, असा पोस्टर घेऊन एक महिला उभी होती. त्याचे अनेक व्हिडिओ आणि पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

IPL 2025 Viral Video I will divorce my husband if RCB loses

IPL 2025 Viral Video I will divorce my husband if RCB loses

मुंबई तक

30 May 2025 (अपडेटेड: 30 May 2025, 03:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचं आरसीबीबतचं अगळवेगळं प्रेम

point

भरस्टेडियममध्ये पोस्टर दाखवून दाखवून दिलं प्रेम

IPL 2025 : इंडियन प्रिमीयर लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे. या आयपीएलचे केवळ भारतातच नाहीतर जगभर फॅन्स आहेत. या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाने चांगली कामगिरी केली आहे. एक असा संघ आहे ज्या संघाला अद्यापही एकदाही अंतिम सामना जिंकता आला नाही. तुम्हाला कळालंच असेल की, तो आयपीएल संघ कोणता आहे. अर्थातच आपण आरसीबी संघाबाबत बोलत आहोत. याआधी एका महिलेनं आरसीबीच्या प्रेमापोटी हातात पोस्टर पकडलं आहे. त्या पोस्टरमध्ये तिने आरसीबी जिंकली नाहीतर घटस्फोट देईन, असं तिच्या पोस्टरमध्ये नमूद केलं होतं.  

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे: शिवसेनेच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केला अन् त्याच्याच भावाच्या...

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्टेडियममध्ये असंख्य फॅन्स आपल्या संघासाठी येत असतात. अशावेळी त्या पोस्टर्समध्ये संघाविषयी तसेच आवडत्या खेळाडूंविषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात. दरम्यान, आरसीबीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघ चांगला फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. अनेकांना असं वाटत आहे की, आरसीबी आयपीएलचा अंतिम सामना जिंकेल. अशातच एका महिलेने आरसीबीच्या विजयासाठी भरस्टेडियममध्ये पोस्टर्स मिरवला. तो पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने आरसीबीचा पराभव झाल्यास नवऱ्याला सोडून घटस्फोट घेणार असल्याचं पोस्टरवर नमूद केलं होतं. संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधित महिलेचे आरसीबीबाबतचं प्रेम पाहून अनेकांना विशेष वाटलं आहे. यावरुन काही मीमही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका मीममध्ये नमूद करण्यात आलं की, 'सांगा महिलेचा घटस्फोट होईल की नाही'? अशा अशयाचे मीम व्हायरल झाले आहे. हाच पोस्टर एका पुरन सिंह नावाच्या नेटकऱ्याने x ट्विटरवर शेअर केला. 

पुरन सिंह यांनी व्हिडिओला कॅप्शन दिलं की, 'आता त्या बिचाऱ्या पतीची यात काय चूक होती?, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आरसीबीने पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबचा धुरळा उडवला आहे. पंजाबच्या होमग्राऊंडवर आरसीबीने पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान फॅन्स हे बऱ्यापैकी आरसीबीलाच सपोर्ट करत होते. सामना जिंकल्यानंतर फॅन्सने जल्लोष केला. 

हेही वाचा : 6 वर्ष अफेअरनंतर लग्न.. पहिल्याच दिवशी पतीने सोडून दिलं, 'हे' गुपित आलं समोर अन्..

याचवेळी कॅमेरामनने या महिलेला आपल्या कॅमेऱ्यात टिपलं. ज्यात ती हातात एक पोस्टर घेऊन उभी होती. ज्यात RCB जर फायनल जिंकली नाही तर  मी घटस्फोट देणार. याचवरुन आपल्या संघासाठी, आपल्या आवडत्या खेळाडूसाठी लोक कधी काय करतील याचा नेम नाही. याचंच एक उत्तम उदहरण आहे. 

    follow whatsapp