Team India Test Cricket : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी दौऱ्यादरम्यान टीम इंडियात खेळणाऱ्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. दरम्यान, या कसोटी संघाची कमान ही टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. तर उपकर्णधार म्हणून रिषभ पंतच्या हातात ही धुरा देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या लेजेंड खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून राजीनामा दिला. त्यानंतर आता ही यंग ब्रिगेड इंग्लंडविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये आपलं प्रदर्शन करणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सूनेचा छळ करणाऱ्या हगवणेंनी बैलासमोर नाचणाऱ्या गौतमीवर केली पैशांची उधळपट्टी
आयपीएलची लीग अद्यापही संपलेली नाही, तोवर कसोटी संघात खेळणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यात साई सुदर्शन आणि गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर करुण नायरलाही खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
मोहम्मद शमीद संघाबाहेर
दरम्यान, वेगवान गोलंदाज असणाऱ्या मोहम्मद शमीला फिटनेसची समस्या उद्भवल्याने तो सध्या संघाबाहेर आहे. अशातच शार्दुल ठाकूरलाही संघात खेळण्यासाठी संधी देण्यात आली आहे. श्रेयश अय्यरऐवजी सर्फराज खानना संघात खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
संघाच्या निवडकर्त्यांनी बीसीसीआयच्या अंतर्गत एक बैठक घेतली. त्या बैठकीत बीसीसीआयची इंग्लंड दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची आणि कोणत्या खेळाडूंना विश्राम द्यायचा याचा विचार विनिमय झाला. त्यानंतर अजित आगरकर यांनी कसोटी संघाबाबत मोठी घोषणा केली.
हेही वाचा : Tri Ekadash Yog 2025: 26 मे 2025 रोजी नशीब उघडणार, शनी-बुधाची युतीमुळे 3 राशींना मिळेल पैशाचं घबाड!
टीम इंडिया कसोटी संघ खेळाडूंची यादी
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यु ईश्वरन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव हे खेळाडू आपल्या इंग्लंडदौऱ्यावर खेळताना दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
