Ind vs Eng : जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून केलं रिलीज

अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा १० विकेटने धुव्वा उडवला. ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. या सिरीजमधला अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावरच खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून रिलीज केलं आहे. अवश्य वाचा – Ind vs Eng : BCCI वन-डे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:53 AM • 27 Feb 2021

follow google news

अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा १० विकेटने धुव्वा उडवला. ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. या सिरीजमधला अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावरच खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून रिलीज केलं आहे.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – Ind vs Eng : BCCI वन-डे सिरीज पुण्याबाहेर हलवण्याच्या तयारीत

चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी बुमराहने बीसीसीआयला विनंती करत खासगी कारणामुळे सुट्टी मागितली होती. बीसीसीआयने त्याची ही विनंती मान्य केली असून शेवटच्या टेस्टसाठी संघात कोणालाही स्थान मिळणार नाहीये.

दरम्यान, अहमदाबादमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इंग्लंडचं World Test Championship मधलं आव्हान संपुष्टात आलंय. परंतू अंतिम फेरीत खेळायचं असेल तर टीम इंडियाला अखेरची टेस्ट मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं गरजेचं आहे. अखेरची टेस्ट मॅच जिंकल्यास भारताचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चीत होईल, पण इंग्लंड अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळेल.

    follow whatsapp