IPL 2022 : KKR ची धुरा मुंबईकर खेळाडूकडे, श्रेयस अय्यर कोलकात्याचा नवीन कर्णधार

आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव नुकताच बंगळुरुत पार पडला. या लिलावात सर्व संघमालकांनी भारतीय खेळाडूंसाठी मोठी बोली लावली. मागच्या हंगामात अंतिम फेरी गाठलेल्या KKR ने आपला कर्णधार ओएन मॉर्गनला संघात कायम राखलेलं नव्हतं. नवीन हंगामासाठी KKR ने मुंबईकर श्रेयस अय्यरवर १२.२५ कोटींची बोली लावत त्याला संघात विकत घेतलं. लिलाव आटोपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या नवीन संघाच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:46 PM • 16 Feb 2022

follow google news

आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव नुकताच बंगळुरुत पार पडला. या लिलावात सर्व संघमालकांनी भारतीय खेळाडूंसाठी मोठी बोली लावली. मागच्या हंगामात अंतिम फेरी गाठलेल्या KKR ने आपला कर्णधार ओएन मॉर्गनला संघात कायम राखलेलं नव्हतं. नवीन हंगामासाठी KKR ने मुंबईकर श्रेयस अय्यरवर १२.२५ कोटींची बोली लावत त्याला संघात विकत घेतलं.

हे वाचलं का?

लिलाव आटोपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या नवीन संघाच्या कर्णधाराचं नाव घोषित केलं असून मुंबईकर श्रेयस अय्यर कोलकात्याचं नेतृत्व करणार आहे.

श्रेयस अय्यरने याआधी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं आहे. २०२० साली झालेल्या स्पर्धेत श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता. परंतू त्यावेळी दिल्लीला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२१ च्या हंगामात श्रेयस दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता.

यानंतर आयपीएलचा उर्वरित हंगाम युएईत हलवण्यात आल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा संघात दाखल झाला. चौदाव्या हंगामाच्या अखेरीस दिल्ली कोणत्या खेळाडूला संघात कायम राखणार याबद्दल सर्व चाहत्यांच्या मनात संभ्रम होता. परंतू दिल्लीने श्रेयस ऐवजी ऋषभ पंतला पसंती दिली. ज्यानंतर श्रेयससाठी KKR ने लिलावात बोली लावत त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे.

IPL 2022: CSK-KKR आणि दिल्लीची मदार महाराष्ट्रातील खेळाडूंवर, मुंबईची स्थानिक खेळाडूंकडे पाठ

    follow whatsapp