ADVERTISEMENT
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यासारख्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हे दिग्गज युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरले आहेत. पण एक क्रिकेटर असाही होता ज्याच्या कृत्याने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.
या क्रिकेटपटूचं नाव लेस्ली हिल्टन असं आहे. वेस्ट इंडिजसाठी सहा कसोटी खेळणाऱ्या आणि 16 विकेट्स घेणाऱ्या लेस्लीला 17 मे 1955 रोजी फाशी देण्यात आली होती.
लेस्ली हा जगातील एकमेव कसोटी क्रिकेटपटू आहे ज्याला अशाप्रकारे फाशीची शिक्षा झाली आहे.
जमैका येथील रहिवासी असलेल्या लेस्ली हिल्टनचे पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी असलेल्या लुर्लिन रोजसोबत प्रेमसंबंध होते.
कुटुंबातील सदस्यांच्या विरोधाला न जुमानता लेस्ली हेस्लीने 1942 मध्ये लुर्लिनशी लग्न केलं. नंतर त्यांना मुलही झालं.
लेस्लीची पत्नी लुर्लिनला फॅशन डिझायनर बनायचं होते, त्यासाठी तिने न्यूयॉर्कला प्रवास करण्यास सुरुवात केली.
1954 मध्ये लेस्लीसा एक पत्र मिळालं, ज्यामध्ये त्याच्या पत्नीचा एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख होता.
लुर्लिननेही हे अफेअर मान्य केलं. रागाच्या भरात लेस्लीने रिव्हॉल्व्हरने लुर्लिनवर सात गोळ्या झाडल्या आणि स्वतः पोलिसांना बोलावलं.
नंतर, लेस्लीला दोषी ठरवण्यात आलं, त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 17 मे 1955 रोजी त्याला फाशी देण्यात आली.
ADVERTISEMENT
