भारताची मिताली राज आता ‘दस हजारी’ मनसबदार

भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली राज जगातली दुसरी तर भारताची पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शार्लट एडवर्डने असा पराक्रम केला होता. ICC Player of The […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:28 AM • 12 Mar 2021

follow google news

भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली राज जगातली दुसरी तर भारताची पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शार्लट एडवर्डने असा पराक्रम केला होता.

हे वाचलं का?

ICC Player of The Month : रविचंद्रन आश्विन पुरस्काराचा मानकरी

वन-डे क्रिकेटमध्ये मिताली राजच्या नावावर ६ हजार ९७४, टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार ३६४ तर टेस्ट क्रिकेटमध्ये ६६३ रन्स जमा आहेत. भारतीय महिला संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या मिताली राजने आतापर्यंत ९ शतकं झळकावली आहेत.

सध्याच्या गडीला न्यूझीलंडची सुएझ बेट्स ७ हजार ८४९, वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ७ हजार ८१६ आणि ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग ६ हजार ९०० रन्ससह मिताली राजच्या पाठीमागे आहेत.

    follow whatsapp