KL Rahul मुंबईतील ‘या’ 4BHK साठी किती मोजतो भाडं?

रोहित गोळे

13 Sep 2023 (अपडेटेड: 13 Sep 2023, 04:00 PM)

Kl Rahul Mumbai 4BHK Flat: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल हा मुंबईतील त्याच्या घरासाठी लाखो रुपये भाडे देत आहे. जाणून घ्या त्याचविषयी.

mumbai kl rahul pays ten lakh rupees rent for 4 bhk flat athiya shetty

mumbai kl rahul pays ten lakh rupees rent for 4 bhk flat athiya shetty

follow google news

Kl Rahul Mumbai Flat: मुंबई: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक झळकवणारा टीम इंडियाचा 31 वर्षीय भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा सध्या बराच फॉर्मात आहे. त्यामुळेच तो चर्चेत देखील आहे. अशातच आता त्याच्या मुंबईतील (Mumbai) फ्लॅटची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केएल राहुल हा पत्नी अथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) मुंबईत एका आलिशान 4-BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतो. गेल्या वर्षी लग्नाआधी तो इथे शिफ्ट झाला होता. लोकेशनवरून तुम्हाला अंदाज आला असेलच की केएल राहुल किती विलासी जीवन जगतो. (mumbai kl rahul pays ten lakh rupees rent for 4 bhk flat athiya shetty)

हे वाचलं का?

बेंगळुरूमध्येही केएल राहुलचे लाखो रुपये किंमत असलेले घर आहे. ज्याची किंमत सुमारे 65 लाख रुपये आहे. राहुल त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या दोन्ही घरांचे फोटो शेअर करत असतो, परंतु तरीही तुम्ही अद्याप त्याच्या मुंबईतील घराचे सौंदर्य पाहिले नसेल, तर आम्ही त्याची खास झलक तुम्हाला दाखवणार आहोत.

मुंबईत प्रचंड महागडं घर

मुंबईतील कार्टर रोडवर केएल राहुल आणि अथिया शेट्टी राहत असलेल्या सी-फेसिंग 4BHK चे भाडे दरमहा तब्बल 10 लाख रुपये एवढं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने इमारतीचा संपूर्ण 8वा मजला भाड्याने घेतला आहे. या घराचं इंटीरियर डेकोरेशन हे केएल राहुलची सासू माना शेट्टी हिने केल्याचे समजतं आहे.

सी-फेसिंग फ्लॅटची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथून दिसणारा नजारा हा अतिशय सुंदर आहे. केएल राहुलच्या बाल्कनीतील फोटोवरून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. निसर्ग सौंदर्य आणि ताजेपणा अनुभवण्यासाठी बाल्कनीमध्ये आकर्षक आरसे बसविण्यात आले असून. बसण्यासाठी रेलिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

प्रत्येक गोष्ट प्रचंड महागडी

लाखो रुपये भाडं असलेल्या या फ्लॅटमध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू श्रीमंती दर्शवते. या घरातील सोफ्यापासून निऑन लाईट फ्रेम असलेला आरसा देखील प्रचंड महाग आहे.

या शैलीतील आरसा पाहूनच हे समजून येतं की, आरशाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या खोलीचा मूड जास्त कष्ट न करता कसा सेट करू शकता.

बंगळुरूच्या घराचे सौंदर्य काही कमी नाही

केएल राहुलचे बंगळुरूतील घरही तितकेच सुंदर आहे. इथे राहुलने वर्कआऊट करण्याच्या उद्देशाने त्याची बाल्कनी सजवली आहे. येथे LED लाइटिंगसह लाकडी फ्लोअरिंग आहे.

याशिवाय घराच्या भिंतींना डिटेलिंगसह अतिशय हलक्या रंगात रंगवण्यात आले आहे. कमी फर्निचरमध्ये तुम्ही तुमच्या घराला लक्झरी लुक कसा देऊ शकता याचे हे घर उत्तम उदाहरण आहे.

    follow whatsapp