Ind Vs Ban : आजपासून भारत विरुद्ध बांग्लादेश ODI मालिकेला सुरुवात; 35 वेळा एकमेकांना भिडले, कोणाचं पारडं जड?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. रविवारी शेर-ए-बांगला स्टेडियमवर या दोघांमध्ये मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशने शेवटच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव केला होता. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वनडेमध्ये भारत की बांगलादेश, कोणाचे पारडे जड आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश हेड टू हेड भारत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:46 AM • 04 Dec 2022

follow google news

भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. रविवारी शेर-ए-बांगला स्टेडियमवर या दोघांमध्ये मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशने शेवटच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव केला होता. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वनडेमध्ये भारत की बांगलादेश, कोणाचे पारडे जड आहे.

हे वाचलं का?

भारत विरुद्ध बांग्लादेश हेड टू हेड

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 35 एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचे वरचेवर बांगलादेशचे पारडे जड झाले आहे. खरे तर या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने भारताला 5 वेळा हरवलं आहे. अशा स्थितीत आकडेवारी पाहता भारताचा बांगलादेशवर वरचष्मा असल्याचे दिसते.

भारत 4 वर्षांपूर्वी एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशमध्ये गेला होता, त्या मालिकेत टीम इंडियाचा बांगलादेशकडून 1-2 ने पराभव झाला होता. अशा स्थितीत मागील एकदिवसीय मालिकेप्रमाणे यावेळीही बांगलादेश संघाला भारताचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित करायचे आहे. त्याचबरोबर मागील मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार आहे.

ढाकामध्ये हवामान कसा असेल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी हवामान खात्याने चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. वास्तविक, हवामान खात्याने सांगितले आहे की सामन्यादरम्यान ढाकामध्ये पावसाची अजिबात शक्यता नाही. दुसरीकडे, रविवारी येथील तापमान 29 अंशांच्या आसपास राहू शकते. क्रिकेटच्या महान खेळासाठी तापमान अगदी योग्य आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवार, 4 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी नेटवर्क आणि सोनी लाइव्ह अॅपवर केले जाईल. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांना डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचा आनंद घेता येईल. तुम्ही Jio TV वर या मालिकेतील सर्व सामन्यांचा थेट आनंद घेऊ शकता.

    follow whatsapp