जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडीयम अशी ओळख असलेल्या गुजरातच्या क्रिकेट मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते मैदानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान अहमदाबादमध्ये तयार व्हावं ही कल्पना पहिल्यांदा सुचली होती. परंतू सरदार पटेलांचं नाव डावलून मोदींचं नाव मैदानाला देण्यावरुन राजकारणात नवीन वादाला सुरुवात झाली.
ADVERTISEMENT
मैदानाला मोदींचं नाव देऊन मोदी सरकार सरदार पटेल यांचा अपमान करत असल्याचं मत विरोधीपक्षातील काँग्रेसने व्यक्त केलं. काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनी ट्विट करत आपली नाराजी बोलून दाखवली.
राहुल गांधी यांनीही ट्विट करत मैदानाला नरेंद्र मोदींचं नाव देण्यावरुन केंद्र सरकारला उपहासात्मक टोला लगावला.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रसेच आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधले कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मैदानाला मोदींचं नाव देण्यावरुन टीका केली आहे.
याव्यतिरीक्त सोशल मीडियावरही दिवसभर मैदानाला मोदींचं नाव देण्यावरुन मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधकांमध्ये सामना रंगलेला पहायला मिळाला. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर आपलं वर्चस्व गाजवलं. इंग्लंडची पहिली इनिंग ११२ रन्सवर संपवत टीम इंडियाच्या बॉलर्सनी इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. अक्षर पटेलने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.
अवश्य वाचा – योगायोग! 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांतची कपिल देव यांच्याशी बरोबरी
ADVERTISEMENT
