Pune Crime: तरुणीने दुसरा तरूण आवडला, पहिला बॉयफ्रेंड चिडला थेट तलवार घेऊन... थरारक घटना CCTV मध्ये कैद

pune crime : पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. अशातच आता पुण्यातील येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.

pune crime

pune crime

मुंबई तक

12 Sep 2025 (अपडेटेड: 12 Sep 2025, 06:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

point

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद 

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime: पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. अशातच आता पुण्यातील येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. संबंधित तरुण हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच रुग्णाला येरवडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यावर आता उपचार सुरू आहेत. या परिसरात अनेक वेळा असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. संबंधित प्रकरण हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्ला प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : युपीएससीच्या विद्यार्थ्याने 'त्या' एका कारणाने गुप्तांगच छाटलं, वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच जाणवू लागला बदल नंतर...

नेमकं काय घडलं? 

तर ज्या तरुणाने हल्ला केला आहे त्या आरोपी तरुणाचे शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे नाव आहे. शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रीणीने त्याच्याशी मैत्री तोडली होती. ज्यानंतर तिने दिप्तिमान दत्ता याच्यासोबत मैत्री केली होती. पण याच रागातून शिवलिंगने दिप्तिमान दत्ता याच्यावर संतापून प्राणघातक हल्ला केला.

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

शिवलिंगला या हल्लात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, शिवलिंग म्हात्रे फरार झालाय.हा सर्व मन हेलावून टाकणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या हल्ल्यात दिप्तिमान देवव्रत दत्तावर दोन तरुणांनी मारहाण केली. संबंधित सीसीटीव्हीत एकूण धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच तरुणांनी दुचाकी वाहनावर बसलेल्या तरुणाच्या गाडीला अनेकदा धक्काही दिल्याचं दिसून येतंय. 

हे ही वाचा : भाचीने मामीचे 'ते' गुपित उघड पाडले, पुतण्याचं प्रेम टिकवण्यासाठी नेमकं काय केलं?

तरुण हा आपल्या मैत्रिणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने त्याच्यावर अचानकपणे हल्ला चढवला. या प्रकरणात शिवलिंगला साथ देणारे सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना पोलिसांनी अटक केली असून, शिवलिंग म्हात्रे अद्यापही फरार आहे. दरम्यान, पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. विद्येचं माहेर घर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

    follow whatsapp