क्रिकेटर Sreesanth विरोधात पुन्हा पोलीस तक्रार, खळबळ उडवून देणारे आरोप! नेमकं प्रकरण काय?

रोहिणी ठोंबरे

• 12:38 PM • 23 Nov 2023

भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतवर (Cricketer S.Sreesanth) फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आहे. केरळमध्ये श्रीसंत आणि इतर दोन लोकांवर 18.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Police complaint again against of cricketer S.Sreesanth sensational allegations on him What exactly happened

Police complaint again against of cricketer S.Sreesanth sensational allegations on him What exactly happened

follow google news

Indian Cricketer S.Sreesanth : भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतवर (Cricketer S.Sreesanth) फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आहे. केरळमध्ये श्रीसंत आणि इतर दोन लोकांवर 18.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात केरळ पोलिसांनी (Keral Police) एकूण तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

हे वाचलं का?

कन्नूर जिल्ह्यातील चुंदा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आरोप केला आहे की, राजीव कुमार आणि व्यंकटेश किनी यांनी 25 एप्रिल 2019 पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकॅडमी उघडण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या तारखांना त्यांच्याकडून एकूण 18.70 लाख रुपये घेतले. या प्रोजेक्टमध्ये श्रीसंतचीही भागीदारी होती.

वाचा: Exclusive: मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, ‘ते’ माझे बॉस..

श्रीसंतसह इतर दोघांवर गुन्हा दाखल!

तक्रारदार सरिश गोपालन यांच्या म्हणण्यानुसार, त्याने श्रीसंतसोबत भागीदार बनण्याच्या आशेने या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये पैसे गुंतवले होते. आता श्रीसंतसह इतर दोघांवरही आयपीसीच्या कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्ता घेण्यास प्रवृत्त केले जाते. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीसंतची नोंद आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाचा: IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता

सध्या श्रीसंत काय करतो?

श्रीसंत सध्या निवृत्त खेळाडूंच्या लीग LLC म्हणजेच लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवत आहे. बुधवारी (22 नोव्हेंबर) रात्री झालेल्या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून खेळताना त्याने भिलवाडा किंग्जविरुद्ध एक विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भिलवाडा किंग्जला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. पण पहिल्या चेंडूवर षटकार मारूनही श्रीसंतने जबरदस्त पुनरागमन केले आणि केवळ 10 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

    follow whatsapp