IPL 2022 : सुरक्षाकवच मोडून रोहित-विराटची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला अटक

मुंबई तक

• 01:58 PM • 10 Apr 2022

पुण्याच्या गहुंजे येथील मैदानावर मुंबई विरुद्ध बंगळुरु या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भेट घेण्यासाठी सुरक्षाकवच मोडून मैदानात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या क्रिकेट चाहत्याने MCA स्टेडीअमचं रेलिंग पार करुन मैदानाच्या दिशेने विराट आणि कोहलीची भेट घेण्यासाठी धाव घेण्याचा […]

Mumbaitak
follow google news

पुण्याच्या गहुंजे येथील मैदानावर मुंबई विरुद्ध बंगळुरु या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भेट घेण्यासाठी सुरक्षाकवच मोडून मैदानात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

या क्रिकेट चाहत्याने MCA स्टेडीअमचं रेलिंग पार करुन मैदानाच्या दिशेने विराट आणि कोहलीची भेट घेण्यासाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी मैदानात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं आहे. मैदानाबाहेर नेत असताना या चाहत्याची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. ज्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्यात या फॅनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL 2022 : RCB च्या हर्षल पटेलवर दुःखाचा डोंगर, मुंबईविरुद्ध सामन्यादरम्यान बहिणीचं निधन

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चाहत्याचं नाव दशरथ राजेंद्र जाधव असं असून तो साताऱ्यातील खंडाळा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दशरथने केलेल्या या प्रकारामुळे MI vs RCB सामना काही क्षणांसाठी थांबवण्यात आला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इतकी काटेकोर सुरक्षा असतानाही या व्यक्तीने हा प्रकार कसा केला याची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान RCB ने मुंबईवर ७ विकेटने मात करत हा सामना जिंकला आहे. मुंबईचा या स्पर्धेतला हा सलग चौथा पराभव ठरला आहे.

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा पुन्हा निराशाजनक खेळ, RCB ची ७ विकेट्सने बाजी

    follow whatsapp