मुंबई: ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. एवढ्या मोठ्या दिग्गजाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वॉर्नच्या निधनानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचवेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नची आठवणींना उजाळा दिला आहे. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर एक वेगळंच नातं होतं, जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याने आजवर पाहिलं होतं.
ADVERTISEMENT
सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये लिहलं की, ‘धक्का बसला… वॉर्नी, तुझी आठवण कायम येत राहील. तुझ्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कोणताही क्षण कंटाळवाणा नव्हता. मैदानावरीलआमची स्पर्धा आणि बाहेरची धमाल मला नेहमी लक्षात राहील. तुमच्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुमचं विशेष स्थान होतं. तू खूप लवकर सोडून गेलास’
शारजाहमध्ये 1998 साली सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ऐतिहासिक डेझर्ट स्टॉर्म इनिंग खेळली होता. तेव्हा सचिनने शेन वॉर्नच्या गोलंदाजीचा अक्षरश: पालापाचोळा करुन टाकला होता.
शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकरची लढत 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात शिगेला पोहोचली होती. याच कारणामुळे एकदा शेन वॉर्न म्हणाला की सचिन त्याच्या स्वप्नात यायचा.
हे दोन्ही दिग्गज मैदानात जेवढे एकमेकांचे कट्टर वैरी होते. तेवढेच मैदानाबाहेर जवळचे मित्रही होते. सर डोनाल्ड ब्रॅडमनसोबत सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्नचे छायाचित्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर शेन वॉर्नच्या संपर्कात होता आणि दोघेही अनेक लीग एकत्र खेळले देखील होते.
पाहा कोणी-कोणी वॉर्नला दिली श्रद्धांजली
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. विराट कोहलीने लिहिले की, ‘आयुष्य किती बेभरवशाचं आणि अस्थिर आहे. अशा महान खेळाडूच्या निधनावर विश्वास बसत नाही ज्याला मी मैदानाबाहेरही ओळखत होतो. चेंडू फिरवणारा महान खेळाडू.’
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने लिहिले की, ‘जागतिक क्रिकेटसाठी हा दुःखद दिवस आहे. आधी रॉडनी मार्श आणि आता शेन वॉर्न. हृदय पिळवटून टाकणारा क्षण आहे. वॉर्नसोबत खेळण्याच्या गोड आठवणी आहेत. तो फिरकीचा जादूगार आणि क्रिकेटचा एक दिग्गज होता. पण तो खूपच आधी निघून गेल्याने त्याची उणीव भासत राहिल. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.’
Shane Warne Ball of the century: तुम्ही शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ पाहिलाय का?, तसा चेंडू कुणीही टाकू शकलं नाही!
दरम्यान, क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी वॉर्नने घेतली एक्झिट ही त्याच्या चाहत्यांना नक्कीच चटका लावणारी अशीच आहे.
ADVERTISEMENT
