इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅच सिरीजसाठी चेन्नईत दाखल झालेल्या भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवून भारतीय संघाने चेपॉकच्या मैदानावर सोमवारी पहिल्यांदा सराव केला. कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व इतर खेळाडू या ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT
५ फेब्रुवारीपासून पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार असून पहिल्या दोन टेस्ट मॅच याच मैदानावर खेळवण्यात येतील. यातील दुसऱ्या टेस्ट मॅचला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ५० टक्के जागांवर प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली आहे. सुरुवातीला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे TNCA ने दोन्ही टेस्ट मॅचसाठी फॅन्सना मैदानात प्रवेश नाकारला होता.
World Test Championship च्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये निर्णयाक विजयाची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिरीजमध्ये बाजी मारल्यानंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये टीम इंडिया इंग्लंडचा सामना कसा करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
