इंग्लंडविरुद्ध सामना जिंकला; पण टीम इंडियाची ‘ही’ कमजोरी कायम, कार्तिकने केली निराशा

इंग्लंडविरुद्धचा टी-20 (IND vs ENG T20 Series) सामना त्यांच्या घरच्या मैदानावर 50 धावांच्या फरकाने जिंकल्यानंतर भारतीय संघाने कमबॅक केला आहे. हा सामना साउथम्प्टन पार पडला. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजयाची नोंद करत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने (Team India) हा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे, पण अजूनही एक […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:09 AM • 08 Jul 2022

follow google news

इंग्लंडविरुद्धचा टी-20 (IND vs ENG T20 Series) सामना त्यांच्या घरच्या मैदानावर 50 धावांच्या फरकाने जिंकल्यानंतर भारतीय संघाने कमबॅक केला आहे. हा सामना साउथम्प्टन पार पडला. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजयाची नोंद करत 1-0 अशी आघाडी घेतली.

हे वाचलं का?

टीम इंडियाने (Team India) हा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे, पण अजूनही एक कमजोरी आहे, जी दूर होण्याचे नाव घेत नाही आहे. ही कमजोरी आहे टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षण. साउथहॅम्प्टन सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सर्वात जास्त निराशा केली.

या सामन्यात टीम इंडियाने सोडले 6 झेल

इंग्लंडविरुद्ध साउथहॅम्प्टन टी-20 सामन्यात टीम इंडियाने एकूण 6 झेल सोडले होते. हे झेल घेतले असते तर इंग्लिश संघ खूप आधीच बाद झाला असता, तसेच विजयाचे अंतरही अधिक वाढू शकले असते. यादरम्यान यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सर्वाधिक 3 झेल सोडले. यामध्ये हॅरी ब्रूकचा झेल महत्त्वाचा ठरला, ज्याने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक 28 धावा केल्या.

मोईनलाही जीवदान मिळाले

याशिवाय सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि दीपक हुडा यांनीही प्रत्येकी एक झेल सोडला. इंग्लंडकडून सर्वाधिक 36 धावा करणाऱ्या मोईन अलीचा कॅच सूर्याने सोडला. सूर्यकुमारने झेल सोडला तेव्हा मोईन 18 धावांवरती खेळत होता. त्याचवेळी चहलने त्याच्याच गोलंदाजीवर ख्रिस जॉर्डनचा झेल सोडला. तर दीपक हुडाने टायमल मिल्सचा झेल सोडला.

सामन्यात कोणी किती झेल सोडले

दिनेश कार्तिक – 3

सूर्यकुमार यादव – 1

युझवेंद्र चहल – 1

दीपक हुडा – 1

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गडी बाद 198 धावा केल्या. यादरम्यान हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. यानंतर 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 148 धावांवर गारद झाला. हार्दिकने येथेही मोठी भूमिका बजावली. त्याने 4 षटकात 33 धावा देत 4 विकेट घेतल्या. या सामन्यात हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

    follow whatsapp