U-19 World Cup : भारताची चांगली सुरुवात, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडवर १७४ धावांनी मात

मुंबई तक

• 08:15 AM • 20 Jan 2022

कॅरेबिअन बेटांवर सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा धुव्वा उडवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडला ३०८ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा संघ १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे भारताने १७४ धावांनी मोठा विजय मिळवला. […]

Mumbaitak
follow google news

कॅरेबिअन बेटांवर सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा धुव्वा उडवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडला ३०८ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा संघ १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे भारताने १७४ धावांनी मोठा विजय मिळवला.

हे वाचलं का?

भारतीय संघाकडून अंगरिक्ष रघुवंशी आणि हरनुर सिंग यांनी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रघुवंशीने १० चौकार आणि २ षटकार लगावत ७९ तर हरनुरने ८८ धावा केल्या. याव्यतिरीक्त राज बावा आणि निशांत संधु या फलंदाजांनीही फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मदत केली. शेवटी राजवर्धन हंगरगेकरने तुफानी खेळी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ५ षटकार एक चौकराच्या साहाय्याने ३९ धावा केल्या. याच जोरावर भारतीय संघाला ३०० धावांचा पल्ला गाठण्यात यश आलं.

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १३३ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात आयर्लंड संघाकडून स्कॉट मॅकबेथने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अनिश्वर गौतमने आणि कौशल तांबे यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले होते. भारतीय संघाने सुरिवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना २२ जानेवारी रोजी युगांडा संघाविरुद्ध पार पडणार आहे.

U-19 WC मधल्या भारतीय टीमच्या सदस्यांनाही कोरोनाची लागण, बीसीसीआयने दिली माहिती

    follow whatsapp