Vijay Hajare Trophy : कर्नाटकवर मात करुन मुंबई अंतिम फेरीत

मुंबई तक

• 12:48 PM • 11 Mar 2021

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीच्या मैदानावर सेमी फायनलमध्ये बलाढ्य कर्नाटकवर ७२ रन्सनी मात करत मुंबईने फायनलचं तिकीट बूक केलं आहे. अंतिम फेरीत मुंबईसमोर उत्तर प्रदेशचं आव्हान असणार आहे, उत्तर प्रदेशने गुजरातला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत शतक […]

Mumbaitak
follow google news

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीच्या मैदानावर सेमी फायनलमध्ये बलाढ्य कर्नाटकवर ७२ रन्सनी मात करत मुंबईने फायनलचं तिकीट बूक केलं आहे. अंतिम फेरीत मुंबईसमोर उत्तर प्रदेशचं आव्हान असणार आहे, उत्तर प्रदेशने गुजरातला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत शतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. पृथ्वी शॉने १२२ बॉल्समध्ये १७ फोर आणि ७ सिक्सचा पाऊस पाडत १६५ रन्स केल्या.

हे वाचलं का?

टॉस जिंकून कर्नाटकने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. दुर्दैवाने महत्वाच्या सामन्यात मुंबईची सुरुवातच खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि आदित्य तरे हे भरवशाचे बॅट्समन लवकर आऊट झाले. चौथ्या नंबरवर आलेल्या शम्स मुलानीने पृथ्वीला चांगली साथ दिली. परंतू यादरम्यान त्याने खूप बॉल खर्च केले ज्यामुळे मुंबई बॅकफूटला फेकली गेली. कृष्णप्पा गौथमने शम्स मुलानीला आऊट करत मुंबईला आणखी एक धक्का दिला…यानंतर पृथ्वीने दुसऱ्या बाजूने गिअर बदलत फटकेबाजीला सुरुवात केली. कर्नाटकच्या बॉलर्सवर तुटून पडत शिखरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. आपलं शतक पूर्ण केल्यानंतर द्विशतकाच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या पृथ्वीला कर्नाटकच्या विजयकुमारने आऊट केलं…यानंतर मुंबईच्या अखेरच्या फळीतले बॅट्समन फारशी चमक दाखवू शकले नाहीत, आणि मुंबईचा डाव ३२२ वर संपला. कर्नाटककडून विजयकुमारने ४, प्रसिध कृष्णाने ३ तर रोनित मोरे-श्रेयस गोपा आणि कृष्णप्पा गौथमने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल कर्नाटकची सुरुवातही खराब झाली. कॅप्टन रवीकुमार समर्थ धवल कुलकर्णीच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकाकडून फॉर्मात असलेल्या देवदत्त पडीक्कलवर अंकुश ठेवण्यात मुंबईच्या बॉलर्सला यश आलं. पडीक्कलने ६४ बॉलमध्ये ६४ रन्स केल्या. यानंतर कर्नाटकची मिडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. करुण नायर, श्रेयस गोपाळ आणि बी.आर.शरथ यांनी मुंबईच्या बॉलर्सना चांगली झुंज दिली…परंतू मुंबईच्या बॉलर्ससमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. मुंबईकडून तुषार देशपांडे, तुषार कोटीयन आणि प्रशांत सोलंकी यांनी २-२ विकेट्स घेतल्या. धवल कुलकर्णीनेही टिच्चून मारा करत १ विकेट घेतली.

    follow whatsapp