भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टेस्ट मॅचला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरुवात झाली आहे. भारतीय बॉलर्सनी बहारदार कामगिरी करत पहिल्या सेशनअखेरीस इंग्लंडच्या ३ विकेट घेतल्या. अखेरच्या टेस्ट मॅचसाठी भारताने जसप्रीत बुमराहच्या जागेवर मोहम्मद सिराजला संधी दिली. सिराजनेही महत्वाच्या विकेट घेत कॅप्टनने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना केला.
ADVERTISEMENT
मोहम्मद सिराज आपल्या १३ व्या ओव्हरचा शेवट बेन स्टोक्सला बाऊन्सर टाकून केला. यानंतर स्टोक्सने सिराजला उद्देशून काही स्टेटमेंट केलं. सिराजने स्टोक्सला उत्तर दिलं नसलं तरीही विराट कोहलीने सूत्र आपल्या हाती घेत स्टोक्सला उत्तर देण्यास सुरुवात केली. ओव्हरदरम्यान दोघांमध्ये शाब्दीक युद्ध रंगत होतं, परंतू प्रकरण हाताबाहेर जातंय असं वाटल्यानंतर पंच मेनन आणि शर्मा यांनी मध्यस्थी करत दोघांनाही थांबवलं.
इंग्लंडचे बॅट्समन एकामागोमाग एक आऊट असताना बेन स्टोक्सने भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना करत हाफ सेंच्युरी झळकावली. १२१ बॉलमध्ये स्टोक्सने ६ फोर आणि २ सिक्स लगावत ५५ रन्सची इनिंग खेळली. वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर तो आऊट झाला.
ADVERTISEMENT
