Virat Kohli: इंस्टाग्रामवर ‘दुहेरी शतक’; एका पोस्टसाठी घेतो इतके पैसे

विराट कोहली (Virat Kohli) मागच्या ३ वर्षांपासून मैदानावरील शतकाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु कोहलीने इंस्टाग्रामवरती कोहलीने डबल सेंचुरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीचे इंन्टाग्रामवरती (Instagram) भारतात सर्वाधिक फॉलोअर्स (Most Followers on Instagram in India) आहेत. आता तो आशियातील २०० मिलीयन फॉलोअर्स असलेला पहिलाच व्यक्ती ठरला आहे. जगातील सर्वाधित फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या पाचमध्ये […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 06:57 AM • 08 Jun 2022

follow google news

विराट कोहली (Virat Kohli) मागच्या ३ वर्षांपासून मैदानावरील शतकाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु कोहलीने इंस्टाग्रामवरती कोहलीने डबल सेंचुरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीचे इंन्टाग्रामवरती (Instagram) भारतात सर्वाधिक फॉलोअर्स (Most Followers on Instagram in India) आहेत. आता तो आशियातील २०० मिलीयन फॉलोअर्स असलेला पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

हे वाचलं का?

जगातील सर्वाधित फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या पाचमध्ये २ खेळाडू आहेत ते म्हणजे फुटबॉलर रोनाल्डो आणि मेस्सी. विराट कोहली एकाद्या गोष्टीचे प्रमोशन करण्यासाठी किती पैसे घेतो हे जाणून घेवूयात त्याचबरोबर कोहलीचा नेट वर्थ किती आहे तेही जाणून घेवूयात.

इंस्टाग्रामवरती एका पोस्टमधून कोहली कमावतो कोट्यावधी

विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. Instagram पोस्टच्या माध्यामातून पैसे कमावण्यामध्ये विराट कोहली १९ व्या क्रमांकावर आहे. तो भारतात इंन्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमावण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. विराट कोहली एका पेड पोस्टसाठी ६८ हजार डॉलर चार्ज करतो. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती सुमारे १२७ दशलक्ष डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती ९५० कोटी इतकी आहे.

विराट कोहलीने काल इंन्टाग्रामवरती एक विशेष पोस्ट देखील केली होती. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत १६ लोक विराट कोहलीच्या पुढे आहेत. या यादीत सर्वात वरच्या क्रमाकावर फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे, ज्याचे ४४७ मिलीयन फॉलोअर्स आहेत. खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली सर्वाधिक फॉलोअर्स असलेला तिसरा खेळाडू आहे, त्याच्या पुढे रोनाल्डोशिवाय मेस्सीदेखील आहे.

    follow whatsapp