WTC Final पूर्वी ऑस्ट्रेलियाची रणनीती, टीम इंडियाच्या पराभवासाठी रचला डाव

मुंबई तक

• 11:26 AM • 31 May 2023

येत्या 7 जुन पासून वर्ल्ड़ टेस्ट चॅम्पियशला सुरूवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने रणनिती आखली आहे. या रणनितीतून टीम इंडियाचा पराभव करण्याचा ऑस्ट्रेलियाचा इरादा आहे

wtc final 2023 ind vs aus australia pacer josh hazlewood reveals secrets of virat kohli success

wtc final 2023 ind vs aus australia pacer josh hazlewood reveals secrets of virat kohli success

follow google news

WTC Final India vs Australia : आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने नाव कोरले आहे. या स्पर्धेनंतर आता क्रिकेट फॅन्सचे लक्ष वर्ल्ड़ टेस्ट चॅम्पियशकडे (WTC Final 2023) लागले आहे. या स्पर्धेला येत्या 7 जुनला सुरूवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने रणनिती आखली आहे. या रणनितीतून टीम इंडियाचा पराभव करण्याचा ऑस्ट्रेलियाचा इरादा आहे. (wtc final 2023 ind vs aus australia pacer josh hazlewood reveals secrets of virat kohli success)

हे वाचलं का?

टीम इंडियाचा (Team India) पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने (Australia) माईंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. या माईंड गेमनुसार ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीम इंडियाच्या खेळाडूंचे भरभरून कौतूक करणार आहेत. या रणनितीनुसारच आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंचे कौतूक सुरु केले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (josh hazlewood) हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळूरूकडून खेळतो. या जोश हेजलवूडने आता टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतूक करायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा : ‘निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ’, IPL 2023 जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची मोठी घोषणा

विराट-सिराजचे कौतूक

जोश हेजलवूड विराटचे कौतूक करताना म्हणतो की, भारतीय खेळाडूची क्रिकेटप्रती खुप बांधिलकी आहे. तो जितकी मेहनत करतो त्याला काहीच तोड नाही आहे. त्यामुळेच बॅटींग आणि फिल्डींगमध्ये तो खुप चांगला आहे. जोश हेजलवूडने सिराजचे कौतूक केले आहे. मी यावर्षी उशिराने आरसीबीशी जोडलो गेलो. पण त्यापुर्वीच तो चांगले प्रदर्शन करत होता. तो नेहमीच विकेट घेतो, त्याचा इकॉनॉमीही इतका चांगला की चिन्नास्वामी स्टेडिअमवर तो अशक्य आहे. बॉलिंगवर त्याचं नियंत्रण आहे, तो खुप चांगली गोलंदाजी करतो.

दरम्यान ऑस्ट्रेलिया नेहमीच मोठ्या स्पर्धेपुर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचे कौतूक करून त्यांचा आत्मविश्वास वाढवत असते. जेणेकरून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा आणि मैदानात ते अपयशी ठरावेत, असा ऑस्ट्रेलियाचा डाव असतो. हाच डाव आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी ऑस्ट्रेलियाने आखला आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिक्य रहाणे, के एल राहूल, के एस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स कर्णधार, स्कॉट बोलेंड, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रॅनशो, स्टीव स्मिथ उप कर्णधार, मिचेल स्टार्क,डेविड वॉर्नर

    follow whatsapp