गुरु आणि शुक्र 12 वर्षानंतर येणार एकत्र, 'या' राशीतील लोकांची आर्थिक चणचण होणार दूर

Astrology 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. १२ वर्षांनंतर, गुरु आणि शुक्र मिथुन राशीत एकत्र येतील. हा योगायोग जुलै २०२५ मध्ये घडेल.

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

वैदिक जोतिषशास्त्रात एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. 12 वर्षानंतर, गुरू आणि शुक्र ग्रह हा मिथून राशीमध्ये प्रवेश करत एकत्र येणार आहेत. हा योगायोग जुलै 2025 मध्ये घडणार आहे. 
 

Astrology

2/5

गुरू ग्रह ज्ञान आणि समृद्धीकारक आहे. शुक्र ग्रह संपत्ती, समृद्धी आणि भौतिक सुख देतो. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींना चांगला फायदा होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांमध्ये प्रगती प्राप्त होऊन आदर मिळू शकेल, जाणून घेऊयात याबाबत एकूण माहिती. 

Astrology

3/5

मिथून राशी

मिथून राशीच्या लोकांसाठीचा दिवस आत्मविश्वासपूर्ण आणि वैवाहिक आनंद देणारा आहे. या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक लोकांचे जीवन हे आनंदी राहील. तुम्हाला आपल्या कामाचे श्रेय मिळणार आहे. कुटुंबात आनंद आणि शांती राहणार आहे. प्रेम संबंधामध्ये विश्वास वाढणार आहे. 
 

Astrology

4/5

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी ही युती खास आहे. तुमच्या धन आणि वाणीच्या घरात ही युती तयार होणार आहे. या काळात अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांचे प्रमोशन होईल. खोळंबलेली कामे लगेचच पूर्ण होतील. 
 

Astrology

5/5

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळणार आहे. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जुनी गुंतवणूक नफा देईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सासू-सासऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी