Astrology : जुलै महिन्यात पंचक योग, ‘या’ राशींवर टांगती तलवार
Astrology : मंगळ आणि नेप्च्यून ग्रहांत 72 डिग्रीचा विशेष कोण तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात याला महत्त्वाचा संयोग मानला जातो. उर्जा, निर्णय क्षमता, भावना आणि मानसिक स्थितीवर चांगला प्रभाव पडू शकतो. मंगळ ग्रह हा देखील शौर्य, पराक्रम आणि जोशाचं प्रतीक मानले जाते. तर दुसरीकडे वरूण म्हणजेच नेप्च्यून कल्पनाशक्ती, रहस्य आणि संवेदनशीलतेचं प्रतिनिधीत्व करतो. या दोन्ही ग्रहांच्या संयोगाचा काही राशींसाठी आव्हानात्मक परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/5
मंगळ आणि नेप्च्यून ग्रहांत 72 डिग्रीचा विशेष कोण तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात याला महत्त्वाचा संयोग मानला जातो. उर्जा, निर्णय क्षमता, भावना आणि मानसिक स्थितीवर चांगला प्रभाव पडू शकतो. मंगळ ग्रह हा देखील शौर्य, पराक्रम आणि जोशाचं प्रतीक मानले जाते. तर दुसरीकडे वरूण म्हणजेच नेप्च्यून कल्पनाशक्ती, रहस्य आणि संवेदनशीलतेचं प्रतिनिधीत्व करतो. या दोन्ही ग्रहांच्या संयोगाचा काही राशींसाठी आव्हानात्मक परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे.

2/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्यासाठी हा काळ महत्त्वपूर्ण असेल. शेअर बाजार, जुगार, लॉटरी किंवा इतर कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहणे उत्तमच राहिल. चुकीच्या निर्णयाने आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

3/5
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. कामाच्या सततच्या दबावामुळे थकवा आणि ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे. वाहन चालवताना निष्काळजीपणा टाळावा. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे.

4/5
धनु
धनु राशीच्या व्यक्तीसाठी हे योग मानसिक अस्थिरता किंवा गोंधळ निर्माण करू शकतात. भावनांच्या आहारी जाऊन मोठे निर्णय घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध आणि काम या दोन्हींवर होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी संयम राहणे आणि रागावर नियंत्रण फायदेशीर ठरेल.

5/5
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या खर्चावर विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. चैनीच्या किंवा अनावश्यक वस्तूंवर अचानकपणे खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बघण्याची शक्यता आहे.










