Astro: तुमच्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नाही? मग 'हे' उपाय एकदा ट्राय करून बघाच
बऱ्याच अडचणींमुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. अनेकदा अभ्यास केल्यावर सुद्धा मुलं त्या गोष्टी विसरतात. यासाठी ज्योतिषांनी काय उपाय सांगितले आहेत? जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलांचं अभ्यासात लक्ष वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार उपाय
मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसल्यास काय करावं?
ज्योतिषांनी सांगितल्या टिप्स
Astro: नैना ही (काल्पनिक नाव) एक हुशार विद्यार्थिनी होती. मात्र, परीक्षेची वेळ जवळ येताच ती घाबरू लागली. तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि शिकवलेल्या गोष्टी विसरत असल्यामुळे तिला खूपच ताण जाणवत होता. हे पाहून तिचे आई-वडील काळजीत पडले.
यादरम्यान, कुणीतरी नैनाच्या आईला ज्योतिषाचा सल्ला घेण्याचं सुचवलं. सुरुवातीला तिला ही सगळी मस्करी वाटली. मात्र, नैनाच्या मानसिक स्थितीमुळे तिला खूपच चिंता वाटत असल्यामुळे त्यांनी ज्योतिषांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याचा ठरवलं.
त्यावेळी ज्योतिषी म्हणाले, "मुलांच्या शिक्षणावर त्यांच्या ग्रहांचा खोलवर परिणाम होतो. चंद्र ग्रह मनावर, बुधचा बुद्धीवर आणि सूर्य ग्रहाचा एकाग्रता तसेच आरोग्यावर प्रभाव पडतो. जर हे ग्रह नियंत्रणात म्हणजेच संतुलित असतील तर मुलांना अभ्यासात यश मिळू शकते."
हे ही वाचा: घरात लागतं भांड्याला भांडं! प्रत्येक वेळी नुसतीच भांडणं..काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
याविषयी सुप्रसिद्ध ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी काय सांगितलंय? परीक्षेच्या वेळी मुलांची काळजी कशी घ्यावी? शिक्षणाचा ग्रहांशी काय संबंध आहे? आणि तुमच्या मुलाला अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी कोणते उपाय करता येतील? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.










