घरात लागतं भांड्याला भांडं! प्रत्येक वेळी नुसतीच भांडणं..काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
Astrology Tips In Marathi : घरगुती तणाव, वादविवाद आणि सतत खराब होणारे उपकरण भविष्यात मोठ्या संकटांचा इशारा देऊ शकतात. ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या समस्यांकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घरात तणाव आणि नकारात्मक परिस्थिती आहे का?

सतत खराब होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच बदला

कुटुंबात विनाकारण भांडण होत असेल तर काय कराल?
Astrology Tips In Marathi : घरगुती तणाव, वादविवाद आणि सतत खराब होणारे उपकरण भविष्यात मोठ्या संकटांचा इशारा देऊ शकतात. ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या समस्यांकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं. जाणून घ्या अशा गोष्टींच्या मागे कोणती कारणे असतात? हे संकट दूर करण्याचे उपाय कोणते? याबाबत जाणून घ्या.
ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञ शैलेंद्र पांडे यांच्या माहितीनुसार, घरात असलेल्या काही सामान्य समस्या नकारात्मक उर्जा वाढवू शकतात आणि जीवनात अनेक प्रकारची संकटं आणू शकतात. अशा पाच प्रमुख समस्या आणि त्यांच्यावर कोणते उपया करावेत,जाणून घ्या.
घरात तणाव आणि नकारात्मक परिस्थिती
घरात प्रवेश केल्यानंतर मन अस्वस्थ आणि अशांत होतं. हे नकारात्मक उर्जेचं संकेत आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही स्थिती गुरू ग्रहाच्या कमकुवतपणामुळे निर्माण होऊ शकतं.
उपाय : प्रत्येक संध्याकाळी पूजास्थळी तूप किंवा तेलाचा दिवा पेटवा. संपूर्ण घरात धूप किंवा अगरबत्ती लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक उर्जा येते.