'या' तारखेला जन्मलेल्या मुलींकडे मुलं का होतात आकर्षित.. काय आहे नेमकं कारण?
Numerology: अंकशास्त्रात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मानवी जीवनाशी निगडीत आहेत. त्यापैकीच मूलांक आणि त्याबाबतच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जाणून घ्या 7 या मूलांकाविषयी

7 मूलांक असलेल्या मुली नेमक्या कशा असतात

7 मूलांकाच्या तरुणीकडे तरुण का होतात आकर्षित?
Numerology Radix Number 7: अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे करिअर, स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे मूळ संख्येवरून सहजपणे ठरवता येते. जरी, प्रत्येक नंबर असलेल्या प्रत्येक मुलीचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे आणि अद्वितीय असते. पण काही मूलांक किंवा जन्मतारखेला जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व असे असते की, त्यांना पाहून प्रत्येक मुलगा आकर्षित होतो.
आपले नाव आणि जन्म यांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. याद्वारे आपण आपल्या स्वभावाबद्दल आणि वर्तनाबद्दल जाणून घेऊ शकतो. अंकशास्त्रात, मूळ संख्या व्यक्तीच्या जन्मतारखेपासून मोजली जाते. ज्यावरून आपले भविष्य आणि नशीब सहजपणे समजू शकतं.
हे ही वाचा>> Vastu Tips: तुमच्या घरातून 'या' गोष्टी ताबडतोब काढा बाहेर, नाहीतर काही खरं नाही!
ज्याप्रमाणे आपली राशी आपल्या नावावरून निश्चित होते, त्याचप्रमाणे आपली मूळ संख्या आपल्या जन्मतारखेवरून निश्चित होते. जर तुम्हाला तुमचा मूलांक माहीत नसेल. तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेचे अंक जोडून तुमचा मूलांक सहजपणे शोधू शकता. मूलांक नेहमीच 1 ते 9 दरम्यान असतो. जर तुमच्या जन्मतारखेत दोन अंक असतील तर त्यांना एक अंक येईपर्यंत जोडा.
उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9=11+1=2. अशा प्रकारे, 29 तारखेला जन्मलेल्या सर्व लोकांचा मूलांक 2 असेल.