भारत-पाकिस्तान युद्ध होणार का? कोणत्या महिन्यात पडणार मुसळधार पाऊस? प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी वाचून थक्कच व्हाल

मुंबई तक

Bhendwal Bhavishyawani Latest Update : आयुष्यात पुढे काय होणार आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची भविष्यवाणी ऐकण्याची इच्छा असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ADVERTISEMENT

Bhendwal Bhavishyawani Latest Update
Bhendwal Bhavishyawani Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाकिस्तान युद्धाबाबत भेंडवळने काय केली भविष्यवाणी?

point

कोणत्या महिन्यात कोसळणार मुसळधार पाऊस ?

point

भेंडवळच्या भविष्यवाणीबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Bhendwal Bhavishyawani Latest Update : आयुष्यात पुढे काय होणार आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची भविष्यवाणी ऐकण्याची इच्छा असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत,ज्यांनी देशातील परिस्थिती, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार? यावर्षी कोणतं धान्य चांगलं राहील आणि कोणतं पीक खराब होईल, अशाप्रकारच्या अनेक गोष्टींबाबतची भविष्यवाणी बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या एका महाराजांनी केली आहे. संपूर्ण वर्षभरात परिस्थिती कशी राहणार आहे, याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून भविष्यवाणीचा अंदाज बांधला जात आहे.

प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी आहे तरी काय?

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णी नदीच्या किनाऱ्यावर ग्राम भेंडवल वसले आहेत. मागील 300 वर्षांपासून घटस्थापनेची परंपरा या ठिकाणी सुरु आहे. वाघ कुटुंबाची ही परंपरा चंद्रभान महाराज वाघ यांनी अनेक वर्षांपूर्वी सुरु केली होती. आजही वाघ कुटुंब त्यांच्या जीवनात सक्रीय आहे. शेतकऱ्यांनी या घटस्थापनेवर दृढ विश्वास ठेवला आहे. विदर्भातील शेतकरी या घटस्थापनेत केलेल्या भविष्यवाणीवर छुपी नजर ठेऊन असतो. घटस्थापनेत केलेली भविष्यवाणी मागील अनेक वर्षांपासून योग्य ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आजच्या घडीलाही शेतकऱ्यांचं पीक आणि पावसासंदर्भात याच भविष्यवाणीद्वारे माहिती दिली जाते. ही भविष्यवाणी खरी ठरते, असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. 

हे ही वाचा >> पेटलेले कपड्याचे बोळे, पेट्रोल घरात फेकलं, कुटुंब घरात झोपेत असतानाच आग लावली; पंढरपुरात तिघांना...

या वर्षीच्या भविष्यवाणीत स्वर्गीय चंद्रभान महाराज यांचे वंशज सारंगधर महाराज यांनी शेती आणि पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जून महिन्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.तर जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर चांगला असणार आहे.तसच सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसासोबतच अतिवृष्टीचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात शेती सामान्य स्वरुपाचीच असणार आहे. तुरीच्या पिकाचं चांगलं उत्पादन मिळू शकतं. ज्वारीच्या पिकाचंही चांगलं उत्पादन मिळू शकतं.

पण ज्वारीवर मंदीचं सावटही असू शकतं. उडीदच्या पिकाचंही उत्पादन चांगलं होऊ शकतं पण ते पीक खराब होण्याची शक्यता आहे. पण या पिकाच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळू शकतं. तसच मूगाच्या पिकाचंही चांगलं उत्पादन मिळू शकतं. दरम्यान, देशातील आर्थिक स्थितीबाबत भविष्यवाणी करताना सांगण्यात आलंय की, देशाची आर्थिक स्थिती ठीक राहणार नाहीय. सारंगधर महाराजांना विचारण्यात आलंय की, युद्धाचे परिणाम दिसत आहेत का? यावर त्यांनी म्हटलंय की, युद्धसदृष्य परिस्थिती सध्या तर दिसत नाहीय.पण पृथ्वीवर संकट येऊ शकतं. जर यु्द्ध झालं तर महायुद्धासारखी परिस्थिती असेल.

हे ही वाचा >> ATM पासून ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत... 1 मे पासून मोठे बदल, तुमच्या खिशावरचा ताण वाढणार?

अशी होते घटस्थापना

अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी गावाच्या बाहेर एका शेतात सारंगधर महाराज वेगवेगळ्या वस्तुंची घटस्थापना करतात. यानुसार 18 प्रकारचे धान्य ठेवले जातात. यामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडद, मूग, चने, जवस, तीळ, मसूर, बाजरा, भात, अंबाडीसारखे धान्य गोलाकार करून ठेवले जातात. या धान्यांना गोलाकार ठेऊन त्यांच्या मधोमध दीड फुटाचा खड्डा खोदला जातो. या खड्ड्यात पावसाच्या चार महिन्यांचं प्रतिक म्हणून मातीच्या चार ढेपी ठेवल्या जातात.त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भाज्या, वडा, सांडोली (एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ) ठेवलं जातं.  तर पाण्याच्या जवळ एक सुपारी ठेवली जाते. त्यानंत सूर्योदय होण्याआधी या सजवलेल्या वस्तूंमध्ये झालेल्या बदलाच्या आधारावर देशातील पावसाचा अंदाज, पिकांच्या उत्पादनाबाबत आणि देशातील राजकीय, आर्थिक स्थितीवर भविष्यवाणी केली जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp