सूर्यग्रहण 2025: ग्रहणामुळे 'या' राशी आल्या अडचणीत, पाहा तुमच्या राशीत काय!
सूर्यग्रहण 2025 आणि राशीभविष्य: सूर्यग्रहणामुळे काही राशींना आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणत्या राशी आहेत या.
ADVERTISEMENT

मुंबई: 2025 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी घडले आणि या खगोलीय घटनेने ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनेक राशींवर प्रभाव टाकला. हे सूर्यग्रहण भारतात दृश्यमान नसले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा परिणाम सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. विशेषतः काही राशींसाठी हे सूर्यग्रहण अडचणी घेऊन आले आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ग्रहांच्या संयोगामुळे या काळात आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशी: आरोग्य आणि करिअरमध्ये अडथळे
मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण कठीण ठरले आहे. ज्योतिषांच्या मते, सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिचे मीन राशीत संक्रमण झाले, ज्याचा प्रभाव मेष राशीवर पडला आहे. या काळात मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बेफिकीर राहिल्यास किरकोळ आजारांचा त्रास होऊ शकतो, करिअरमध्येही चढ-उतार दिसून येऊ शकतात. कामात अडथळे किंवा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम ठेवून निर्णय घ्यावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा>>Astrology: कोणत्या वाराला कोणत्या रंगाचे कपडे घालावे? ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या टिप्स
कर्क राशी: आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक वाद
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणानंतरचा काळ तणावपूर्ण असू शकतो. या राशीवर सूर्य आणि शनिच्या संयोगाचा विपरीत परिणाम होईल. खर्चात वाढ होऊन आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो, कुटुंबातही किरकोळ वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय टाळावेत, अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीच्या व्यक्तींनी संयम आणि समजूतदारपणा दाखवून परिस्थिती हाताळावी.
तूळ राशी: नोकरी आणि नातेसंबंधात संकट
तूळ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण करिअर आणि वैयक्तिक जीवनात अडचणी घेऊन आले आहे. नोकरीत चुकीमुळे त्रास होऊ शकतो. कामात काळजी घ्या, नाहीतर बॉस किंवा सहकाऱ्यांशी मतभेद वाढतील, वैवाहिक जीवनातही गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या बजेटवर नियंत्रण ठेवावे आणि बोलण्यात संयम राखावा, असा सल्ला देण्यात आला आहे.










