Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं! चांदीची चमकही वाढली, आजचे भाव वाचून टेन्शनच वाढेल
Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं! चांदीची चमकही वाढली, आजचे भाव वाचून टेन्शनच वाढेल इराण-इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं! चांदीची चमकही वाढली, आजचे भाव वाचून टेन्शनच वाढेल
इराण-इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या किंमतीही गगनाला भिडत असल्याचं समोर आलं आहे. आज शुक्रवारी 20 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
तसच चांदीच्या किंमतीही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101220 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92810 रुपये झाले आहेत. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.










