Personal Finance: गणपती, दिवाळीचा खर्च अचानक डोक्यावर नको! वर्षभर आधीपासून अशी करा Festival Savings
गणपती, दिवाळी आणि इतर सणांमध्ये अचानक होणारा मोठा खर्च बजेट बिघडवू शकतो. मात्र वर्षभर आधीपासून छोट्या रकमेची बचत केली तर सणांचा खर्च कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर न टाकता सहज व्यवस्थापित करता येतो.
ADVERTISEMENT

Personal Finance tips ( प्रातिनिधिक फोटो)
Personal Finance tips for Festival Savings: गणपती, दिवाळी, दसरा, होळी किंवा इतर सण म्हटलं की आनंदासोबत खर्चही वाढतो. घराची सजावट, कपडे, दागिने, भेटवस्तू, मिठाई, प्रवास, पूजा साहित्य, मुलांची खरेदी, पाहुणचार आणि विविध कार्यक्रम यामुळे महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता असते. अनेक कुटुंबांमध्ये हा खर्च अचानक समोर आल्याने क्रेडिट कार्ड, EMI किंवा उधारीचा आधार घेतला जातो.
पण सणांचा खर्च हा अचानक आलेला खर्च नसतो. गणपती किंवा दिवाळी दरवर्षी येते हे आपल्याला आधीपासून माहिती असतं. त्यामुळे या खर्चाचं वर्षभर आधीपासून नियोजन केलं तर सणाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
सणांसाठी वेगळं ‘Festival Fund’ तयार करा
सणांच्या खर्चासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा सणाच्या काही महिने आधी Festival Fund तयार करणं.
