Personal Finance: दर महिन्याला 3,000 रुपये वाचवण्याची संधी! 'अशी' होईल लाखोंची गुंतवणूक

रोहित गोळे

दर महिन्याला 3,000 रुपये कसे वाचवायचे? ऑनलाइन शॉपिंग, फूड डिलिव्हरी आणि छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवून बचत व SIPच्या माध्यमातून भविष्यासाठी मोठा निधी कसा उभारता येईल, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

personal finance save 3000 every month small expenses big investment
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

Personal Finance tips for 3000 rs Saving: महिन्याचा पगार येतो, घरखर्च सुरू होतो, ऑनलाइन शॉपिंग, बाहेरचे खाणे, छोट्या-मोठ्या खरेदी आणि सबस्क्रिप्शनचे पैसे कट होतात. महिन्याच्या शेवटी मात्र बचतीसाठी हातात काहीच उरत नाही, अशी अनेक नोकरदारांची तक्रार असते. पण याच छोट्या खर्चांवर नियंत्रण मिळवलं, तर दर महिन्याला 3,000 रुपये वाचवण्याची संधी निर्माण होऊ शकते.

ही रक्कम नियमितपणे बाजूला ठेवून योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात मोठा निधी उभारण्याची सुरुवात होऊ शकते. त्यासाठी पगार वाढण्याची किंवा एकदम मोठी रक्कम गुंतवण्याची वाट पाहण्याची गरज नाही. गरज आहे ती आपल्या खर्चाच्या सवयी समजून घेण्याची आणि बचतीला प्राधान्य देण्याची.

1. दर महिन्याला 3,000 रुपये कुठून वाचवता येतील?

अनेकदा मोठ्या खर्चापेक्षा रोजच्या छोट्या खर्चांचा एकत्रित परिणाम बजेटवर होत असतो. उदाहरणार्थ, खालील खर्चांमध्ये थोडी कपात केल्यास दर महिन्याला 3,000 रुपये वाचवण्याचे लक्ष्य गाठता येऊ शकते.

  • बाहेरचे खाणे आणि फूड डिलिव्हरी

महिन्याला 800 रुपयांची बचत: वारंवार होणाऱ्या ऑर्डर कमी करून घरगुती जेवणाला प्राधान्य द्या.