Maharashtra Weather : राज्यात पुढील काही तासांत धो धो बरसणार वरुणराजा, IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे, जाणून घ्या 21 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुढील काही दिवस मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता
जाणून घ्या 21 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सून स्थिती अगदीच मंदावली आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला. तर कुठे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे. मात्र, मुंबई आणि कोकणातील काही ठिकाणी कडक ऊन पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे, जाणून घ्या 21 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : उल्हासनगर - 3 मध्ये विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कोकण
कोकणात पालघर, मुंबई येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली. ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
