Personal Finance: ITR फायलिंग सुरू, Income Tax कडून 'हे' फॉर्म जारी; नाही भरले तर...

रोहित गोळे

ITR-1 आणि ITR-4 ची Excel Utility जारी केली आहे, आता करदाते सहजपणे रिटर्न भरू शकतात. ITRची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips For ITR: आयकर विभागाने 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) या आर्थिक वर्षासाठी ITR-1 आणि आयटीआर-4 फॉर्म जारी केले आहेत. आता तुम्ही आयकर रिटर्न भरू शकता. रिटर्न भरणाऱ्यांसाठी Excel Utility देखील जारी करण्यात आली आहे. करदाते त्यांचे ITR पूर्वीपेक्षा अधिक सहजपणे दाखल करू शकतात.

विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या अपडेटची माहिती दिली आणि म्हटले की, Excel फॉरमॅटमध्ये रिटर्न भरणारे करदाते आता त्यांचे ITR सहज भरू शकतात. रिटर्न भरणे सुरळीत, सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

ITR-1: कोण भरू शकतं 'सहज' फॉर्म?

  • ITR-1 ला 'सहज' असे नाव देण्यात आले आहे आणि ते अशा करदात्यांसाठी आहे:
  • ज्यांचे एकूण उत्पन्न ₹50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे.
  • जे पगार, भाडे/एका घरातून मिळणारे उत्पन्न, व्याज किंवा इतर स्रोतांमधून कमावतात.
  • ज्यांचे शेतीचे उत्पन्न ₹5000 पर्यंत आहे.
  • LTCG कलम 112 A अंतर्गत ज्यांचे ₹1.25 लाखांपेक्षा कमी आहे.

जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचे उत्पन्न मर्यादित आणि साध्या स्रोतांमधून येत असेल, तर ITR-1 हा तुमच्यासाठी योग्य फॉर्म आहे.

ITR-4: 'सुगम' फॉर्म कोणासाठी आहे?

  • ITR-4 ला 'सुगम' असे नाव देण्यात आले आहे. हा फॉर्म अशा करदात्यांसाठी आहे:
  • ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹50 लाखांपेक्षा कमी आहे.
  • लघु व्यवसाय, फ्रीलांसर, डॉक्टर, सीए किंवा इतर व्यावसायिक.
  • जे कलम 44AD, 44ADA किंवा 44AE अंतर्गत अनुमानित कर योजनेचे पालन करतात.
  • ज्यांच्याकडे ₹1.25 लाख पर्यंत LTCG आहे (कलम 112A अंतर्गत)

जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि व्यवसायातून कमाई करत असाल, तर ITR-4 हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

Excel Utility आणि e-Filing Tools का महत्त्वाचे आहेत?

आयकर विभाग करदात्यांना दोन प्रकारच्या युटिलिटीज प्रदान करतो:

ऑनलाइन युटिलिटी:

हे वाचलं का?

    follow whatsapp