Personal Finance: उद्योगपतीने 'ही' कहाणी शेअर करुन सांगितलं पत्नी अधिक समजूतदार असते, कारण...

मुंबई तक

Personal Finance:हर्ष गोयंका यांचे लेखन पुन्हा चर्चेत आहे. यावेळी त्यांनी पैशाबद्दल म्हणजेच गुंतवणूक नियोजनाबद्दल लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी पत्नीचा सल्ला मानाव असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

Personal Finance: हर्ष गोएंका हे देशातील एक मोठे उद्योगपती आहेत जे RPG Enterprises चे अध्यक्ष आहेत. जे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा असे काहीतरी लिहितात की, जे चर्चेचा विषय बनतं. हर्ष हे आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ आहेत. हर्ष गोयंका नियमितपणे क्रिकेट सामने पाहताना दिसत नसले तरी आयपीएलमध्ये लखनौचा सामना आरआरसोबत होता, त्यामध्ये संजीव आणि हर्ष यांनी एकत्र बसून सामना एन्जॉय केला. 

दरम्यान, हर्ष गोयंका यांचं एक ट्वीट पुन्हा चर्चेत आहे. यावेळी त्यांनी पैशाबद्दल म्हणजेच गुंतवणूक नियोजनाबद्दल लिहिले आहे. मी गाडीत गुंतवणूक करावी की सोन्यात? यावर बराच काळ चर्चा सुरू आहे. गाडी की सोने - हे स्पष्ट करण्यासाठी, हर्ष गोयंका यांनी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीमधील संभाषणाची एक गोष्ट सांगितली.

बायका जास्त समजूतदार असतात - हर्ष

हर्ष गोयंका यांच्या पत्नीचे नाव माला आहे. हर्ष गोएंका यांनी X वरील त्यांची पोस्ट असे लिहून संपवली की बायका (पत्नी) अधिक समजूतदार असतात. हर्ष गोएंका आणि त्यांच्या पत्नीच्या कथेत एक लपलेली गोष्ट आहे. की, जर एखाद्याला कार किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर कोणते जास्त फायदेशीर आहे?

8 लाख रुपयांची गुंतवणूक योजना

हर्ष गोएंका आणि माला गोएंका यांच्यातील 10 वर्षे जुन्या संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 लाख रुपयांची गुंतवणूक योजना आखण्यात आली होती. पती हर्ष गोयंका यांनी 10 वर्षांपूर्वी 8 लाख रुपयांना कार खरेदी केली होती. तर पत्नी माला गोएंका यांनी सोने खरेदी केले. आज हर्षच्या गाडीची किंमत 1.5 लाख रुपये आहे. तर पत्नीने खरेदी केलेल्या सोन्याची किंमत 32 लाख रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp