2000 नोटाबंदी: भारतात पुन्हा 1000 रुपयांची नोट चलनात येणार?
2000 note News: 2000 हजार रुपयांची नोट आता 30 सप्टेंबरनंतर चलनातून बाद होणार आहे. मात्र, असं असताना 1000 रुपयांची नोट चलनात येणार अशी चर्चा चालू झाली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

2000 note News: मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा (2000 Rs Notes) परत घेण्याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत बँक 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेईल आणि सप्टेंबर 2023 नंतर या नोटा चलनातून बाद होतील. RBI ने नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. यासोबतच हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकांनी घाबरून जाऊ नये, या नोटा पूर्वीप्रमाणेच बाजारात चालू राहतील आणि वैध राहतील, परंतु तुम्ही निश्चित तारखेपूर्वी बँकेत जाऊन त्या बदलून घेऊ शकता. (2000 demonetisation will rs 1000 note be circulated again in india)
500 रुपयांची नोट सर्वात मोठी असेल?
आता प्रश्न असा आहे की 500 रुपयांची नोट आता सर्वात मोठी असेल का? जर आपण भारतीय रुपया प्रणालीवर नजर टाकली तर 2000 रुपयांची नोट ही आपल्या नोट प्रणालीतील सर्वात मोठं चलन होतं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने फिकट गुलाबी रंगाची ही नोट जारी केली होती. चलन व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल होता, कारण याआधी 1000 रुपयांचे चलन सर्वात मोठे चलन होते. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी केली तेव्हा त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या.
नव्या रंगातील 500 रुपयांची नोट आलेली चलनात
यानंतर 500 रुपयांची नोट नव्या रंगात परत आली होती तरी 1000 रुपयांच्या नोटेची जागा त्याच्या दुप्पट मूल्याच्या चलनाने घेतली होता. आता आरबीआयने शुक्रवारी क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांची नोट परत घेण्याची घोषणा केली, तेव्हा आता फक्त 500 रुपयांची नोट चलन प्रणालीमध्ये सर्वात मोठी राहिली आहे.
हे ही वाचा >> RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय
1000 रुपयांची नोट पुन्हा येणार बाजारात?
आरबीआयने 2000 रुपयांचे चलन काढून घेतले, मात्र आता 1000 रुपयांचे चलन पुन्हा सुरू होणार का? हा प्रश्न आहे. वास्तविक 1000 रुपयांचे चलन मोठे व्यवहार, बाजारातील खरेदी इत्यादींसाठी योग्य होते. त्यानंतर त्या बंद झाल्यावर मोठ्या चलनात 2000 रुपयांची नोट आली, मात्र या नव्या चलनाबाबत अनेक दिवसांपासून लोकांमध्ये संभ्रम होता. किंबहुना भारतीय जनता आणि मध्यमवर्गीय लोकांच्या विचारसरणीशीही त्याचा संबंध आला आहे. बचतीबाबत भारतीय नेहमीच सावध राहिले आहेत.