23 वर्षाच्या तरुणाने केला 91 वर्षाच्या महिलेशी लग्न, आता करतोय वेगळीच मागणी
अर्जेंटिनामधील 23 वर्षाचा एका वकिलाने आपल्या 91 वर्षाच्या काकीबरोबर लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूनंतर 23 वर्षाचा तरुणाने त्यांच्या पेन्शनवर दावा केला आहे. आम्ही दोघांनी लग्न केल्याचा दावाही त्याने केला आहे.

Viral News : जगात कुठंही लोकं आपल्या लग्नाचा (Marriage) विचार करतात तेव्हा अगदी 2 ते 3 वर्षे किंवा जास्तीत जास्त 5 वर्षांनी लहान किंवा मोठ्या व्यक्तीला आपला जीवनसाथी (Life Partner) म्हणून विचार करतात. मात्र आता जगात अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत. कारण वयामध्ये मोठे (Age Difference) अंतर असलेली अनेक जोडपी आता लग्नबंधनात अडकत आहेत. त्यांच्याचपैकी अनेक जण असाही दावा करतात की, आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात होतो, त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र अशा या नात्यातील (Relationship) सत्यता खूप कटू असते. अशीच एक घटना अर्जेंटिनामध्ये (Argentina) घडली आहे. त्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
तो खरा पेन्शनचा दावेदार
अर्जेंटिनामधील 23 वर्षाचा एका वकिल मौरिसियो यांनी त्यांची मृत 91 वर्षीय काकी योलांडा टोरिस यांच्या पेन्शनवर दावा केला आहे. याबाबत ते म्हणतात की, त्याने फेब्रुवारी 2015 मध्ये त्याच्या 91 वर्षांच्या काकी बरोबर लग्न केले होते. मात्र त्यानंतर काकीचा एप्रिल 2016 मध्ये मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पेन्शनचा तो खरा दावेदार असल्याचे ते मानतात. मात्र नंतर चौकशी केल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, हे लग्न खोटे आहे. त्यामुळे प्रशासनानेही आता त्याचा अर्ज फेटाळून लावल आहे.
हे ही वाचा >> Breast Cancer : महिलेच्या छातीवर लावला सिमेंट अन् चुना, अघोरी उपचाराने गेला जीव
पालक वेगळे झाल्याने घडली घटना
वायव्य अर्जेंटिनातील साल्टा शहरातील मॉरिसिओ हे 2009 मध्ये त्याचे पालक वेगळे झाले होते. त्यानंतर ते त्यांची आई, बहीण, आजी आणि त्यांची मोठी काकू एकत्र राहत होते. तर त्यानंतर 2016 मध्ये योलांडाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पेन्शनसाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली.
शेजारी म्हणतात हे खरं नाही
मॉरिसियोच्या दाव्यानुसार आता प्रशासनाकडून तपास सुरु करण्यात आला आहे. त्यामध्येच्या आधारे तपास सुरू करण्यात आला, ज्यामध्ये कुटुंबाला ओळखत असलेल्या आणि शेजाऱ्यांचा समावेश असलेल्या लोकांबरोबर चर्चा करायला अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती देताना शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यांना लग्नाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मॉरिसिओचा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता मॉरिसिओ हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असून ते निवृत्त वेतन आपल्याला मिळत राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
योलांडावर मनापासून प्रेम
मॉरिसिओने एल ट्रिब्युनो डी साल्टाला मुलाखत देताना सांगितले की, ‘योलांडा माझ्या आयुष्यातील एक मोठा आधार होती, आणि तिचं माझ्याबरोबर लग्न व्हावं ही तिची शेवटची इच्छा होती. त्यामुळे मी योलांडावर मनापासून प्रेम केले आहे.त्यामुळे तिच्या मृत्यूचं दुःख मला आयुष्यभर राहणार आहे.
हे ही वाचा >> घृणास्पद! दलित तरुणांना आधी केलं नग्न, नंतर लघवी…, घडली भयंकर घटना
अभ्यासासाठी दिले पैसे
पेन्शनसाठी अर्ज करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या संदर्भातील सर्व कागदपत्रं दाखवली तरी पेन्शन मिळण्यात मला अडचणी येत आहेत. योलांडाचे वय 90 पेक्षा जास्त असले तरी ती मनाने तरुण होती, असंही तो म्हटला आहे. आमच्या लग्नात कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये एवढीच तिची इच्छा होती असंही त्याने यावेळी सांगितले. मॉरिसिओ म्हणतो की, योलांडाने मला माझ्या कायद्याच्या अभ्यासासाठी पैसे देण्यास मदत केली होती. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण आई-वडील वेगळे झाल्यानंतर मला अभ्यास करावा वाटत नव्हता, पण योलांडामुळे मी पुन्हा अभ्यासात गुंतवून घेतले होते.