रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी (प्रतिनिधी)

MLA Yogesh Kadam car accident: रत्नागिरी: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव आणि खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या कारला अपघात (Car Accident) झाला आहे. मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाताना काल (6 जानेवारी) रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पोलादपूरनजीक (Poladpur) कशेडी घाटात चोळई येथे रायगड (Raigad) जिल्ह्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. (balasahebanchi shiv sena leader ramdas kadams son mla yogesh kadams car accident)

मागून येणाऱ्या टँकरने आमदार योगेश कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला. दरम्यान, या अपघातानंतर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम हे सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, पाठीमागून येणाऱ्या टँकरने आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक दिल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर आदळली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे बरंच नुकसान झालं आहे. सध्या या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

धनंजय मुंडे कारचा भीषण अपघात, छातीला लागला मार; मध्यरात्री काय घडलं?

ADVERTISEMENT

मागून आलेले टँकरची धडक इतकी जोरदार होती की या अपघातात टँकरच पलटी झाला. यामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. ते सुखरूप आहेत. तर ड्रायव्हर दीपक कदम हे देखील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर चोळई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ADVERTISEMENT

BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली

‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका’

दरम्यान, अपघातानंतर आमदार योगेश कदम यांची पाहिली प्रतिक्रिया आली आहे. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत, काळजी करू नका. तसेच पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होणार असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

आमदारांच्या गाड्यांचे अपघात

आमदारांच्या कारच्या अपघाताचं प्रमाण हे गेल्या काही दिवसात वाढत असल्याचं समोर आलं आहे. साधारण पाच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ आमदार विनायक मेटे यांचं भीषण कार अपघात निधन झालं होतं. तर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या देखील कारचा भीषण अपघात झाला होता. मलठण या गावी पुलावरुन त्यांची कार थेट नदी पात्रात कोसळली होती. ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

तर मागील आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील कारचा अपघात झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या असून त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT