Eknath Shinde : ट्रकखाली अडकलेल्या तरुणाचे CM शिंदेंनी वाचवले प्राण; काय घडलं?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

cm-eknath-shinde-saves-life-of-youth-stuck-under-truck-in-accident-what-actually-happened
cm-eknath-shinde-saves-life-of-youth-stuck-under-truck-in-accident-what-actually-happened
social share
google news

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत. (CM Eknath Shinde saves life of youth stuck under truck in accident What actually happened)

नेमकं घडलं तरी काय?

मुंबईहून नागपुरला परत येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता.

वाचा : “आई, मी जे केलंय, ते…”, लोकसभेत घुसणाऱ्या सागरने कुटुंबीयांना काय सांगितलं?

त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगनआर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा : Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? कराचीत घेतोय उपचार

या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता सध्या स्थिर आहे. या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.

वाचा : Pune Accident : तीन वाहने धडकली…10 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा गेला जीव

या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT