Prarthana Behere: '...म्हणून आम्ही मूल होऊ दिलं नाही', अभिनेत्रीने सांगून टाकलं खरं कारण!
Prarthana Behere On her Pregnancy : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही मालिका संपल्यानंतर प्रार्थना बेहेरेने ब्रेक घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.
ADVERTISEMENT
Prarthana Behere On her Pregnancy: मुंबई: 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले. त्यापैकीच एक वैशालीचं पात्र होतं. वैशालीची ही भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरे आज मराठी सिनेसृष्टीतील (Marathi cinema) टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मराठी मालिका तसंच सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, तिचे मोठे फॅन फॉलोइंग आहे. ती तिचे फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते, ज्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. अनेकदा प्रार्थना तिच्या करिअरव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. (Prarthana behere said about why she dont conceive Baby and reason of She not want to get pregnant)
ADVERTISEMENT
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही मालिका संपल्यानंतर प्रार्थना बेहेरेने ब्रेक घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.
हे ही वाचा>> Chinmay Mandlekar : "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या...", चिन्मयचा तडकाफडकी निर्णय
मुंबई सोडून कायमचं अलिबागला शिफ्ट होण्याचा का घेतला निर्णय?
मुलाखतीत प्रार्थनाने सांगितलं की, 'अलिबागला आमची जागा खूप वर्षांपासून होती. माझ्या नवऱ्याच्या (अभीच्या) आजोबांनी ती जागा घेतली होती. कोरोना काळाच्या आधी आम्ही ठरवलं की, ती जागा आता डेव्हलप करूया. त्यानंतर रो-रो बोट सेवा सुरू झाली. आम्ही तिथे घर बांधलं आणि मग हळूहळू तिथे घोडे, कुत्रे असे प्राणीही पाळले. पण यामुळे अभीला आठवड्यातून 4 दिवस तिथे जावं लागत होतं. तेव्हा आम्ही जुहूला राहत होतो आणि माझी मालिकाही सुरू होती. नंतर आम्ही ठरवलं की, आता आपण कायमस्वरूपी तिथेच राहायचं.
हे वाचलं का?
तिथे गेल्यापासून आयुष्यात अनेक बदल घडले आहेत. तिथे गेल्यावर आम्हाला शांती आणि समाधान मिळाले. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून, ताणतणावातून मोकळीक मिळाली. त्या वातावरणात आमचे आयुष्य आणखी वाढले, असे वाटू लागले. तिकडे मी आता मेकअपशिवाय बिनधास्त फिरते. मी लावलेल्या झाडांची काळजी घेते. मला पेंटिंगची खूप आवड आहे, तिथे गेल्यापासून मी ही आवड देखील जोपासली आहे. प्रवासाच्या दृष्टीने थोडा त्रास झाला, पण आता त्याची सवय झाली आहे. आता आम्हाला तिथे जाऊन एक वर्ष पूर्ण झाले.' असं म्हणत प्रार्थनाने अलिबागला कायमचं शिफ्ट होण्याचं कारण सांगितलं.
हे ही वाचा>> Fandry : 'तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला', जब्या-शालूची जमली जोडी?
'मूल होऊ दिलं नाही कारण...', प्रार्थना स्पष्टच बोलली!
त्याचबरोबर प्रार्थनाने आई न होण्यामागचं कारणही सांगितलं आहे. ती म्हणाली, 'मला कधीच मूल नको होतं. त्याऐवजी मला भरपूर प्राणी पाळायचे होते. माझं जेव्हा अभिषेकसोबत लग्न ठरलं, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याची देखील हीच इच्छा होती हे आम्हाला कळलं. आम्हाला दोघांनाही प्राण्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे आम्ही मूल न होऊ देता, प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या या निर्णयाला आमच्या कुटुंबाचा देखील पाठिंबा आहे.' अशा स्पष्ट शब्दात प्रार्थनाने आपली भूमिका मुलाखतीत सांगितली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT