कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 19 वर; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई तक

मुंबई: कुर्ल्यातील नेहरू नगर येथील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 19 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध मोहीम अद्याप सुरूच आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नाईक म्युनिसिपल सोसायटीची 4 मजली इमारत कोसळली. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही बीएमसीने दिली होती, असे असतानाही या इमारतीत अनेक कामगार भाड्याने राहत होते, या इमारतीत किती लोक होते याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: कुर्ल्यातील नेहरू नगर येथील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 19 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध मोहीम अद्याप सुरूच आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नाईक म्युनिसिपल सोसायटीची 4 मजली इमारत कोसळली. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही बीएमसीने दिली होती, असे असतानाही या इमारतीत अनेक कामगार भाड्याने राहत होते, या इमारतीत किती लोक होते याचा नेमका आकडा कोणाकडेच नसला तरी सध्या अग्निशमन दल, एनडीआरएफची शोधमोहीम सुरू आहे.

सर्व कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एकूण 33 कामगारांना बाहेर काढण्यात आले, त्यात 19 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 4 कामगारांवर उपचार सुरू आहेत, तर 10 कामगारांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत चार मजली शिवसृष्टी इमारत जमीनदोस्त; दोघांचा मृत्यू, इतरांचा शोध सुरूच

दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान काल मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या नाईक नगरमध्ये शिवसृष्टी नावाची चार मजली इमारत उशिरा कोसळली. एकाच वेळी चारही मजले कोसळल्याने २० ते २५ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखली दाबले गेल्याचे प्राथमिक माहिती होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलासह मुंबई पोलीस आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासून घटनास्थळी मदत व बचाक कार्य सुरू असून अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती बीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.

या घटनेबद्दल कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारत खाली करण्याची नोटीस मुंबई पालिकेकडून देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतरही काही लोक इमारतीत वास्तव्यास होते, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp