फडणवीसांनी मोदींकडे शब्द टाकला अन् अप्पासाहेबांना...; शाहांनी सांगितला किस्सा - Mumbai Tak - devendra fadnavis request to narendra modi for padma award to appasaheb dharmadhikari amit shah shared expricnce - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

फडणवीसांनी मोदींकडे शब्द टाकला अन् अप्पासाहेबांना…; शाहांनी सांगितला किस्सा

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अमित शाह यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दलचा किस्साही सांगितला.
Amit Shah conferred the Maharashtra Bhushan Award 2022 to spiritual leader and social activist Appasaheb Dharmadhikari.

निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समाजसेवेतील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. खारघर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भावना व्यक्त केल्या. नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हाती घेतलेल्या समाजाच्या सेवेचा गौरव शाह यांनी केला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत योग्य असून, याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, असे उद्गार शाह यांनी यावेळी काढले. यावेळी अमित शाह यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दलचा किस्साही सांगितला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलताना अमित शाह म्हणाले, “प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकाच्या सन्मानासाठी लाखो लोकांची गर्दी मी माझ्या आयुष्यात कधीही बघितली नाही. तिथपर्यंत नजर पोहोचू शकणार इतकं मोठं मैदान, 42 अंश सेल्सिअस तापमान बसलेल्यांकडे बघून कळतंय की, त्यांच्या मनात अप्पासाहेबांबद्दल किती भक्तिभाव, सन्मान आहे. हा भक्तिभाव त्याग, सेवा, समर्पण यातून निर्माण होतो.”

महत्त्वाची बातमी >> राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवारांचं सूचक विधान, राऊतांनी सांगितली स्टोरी

“असं म्हणतात की गर्दीचं अनुसरण करू नका. असं काहीतरी करा की गर्दी तुमचं अनुसरण करेल, अप्पासाहेब तुम्ही असं करून दाखवलं आहे. लाखो लोक तुमचं अनुसरण करण्यासाठी उन्हांच्या झळात बसले आहेत”, असं शाह यावेळी म्हणाले.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघत आहे -अमित शाह

“मी वयाच्या 12 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. देशविदेशातील इतिहास मी व्यवस्थित वाचला आहे. मी अनेकवेळा बघितलं की, लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक पिढ्यांपर्यंत राहते. मी हेही बघितलं आहे की, एकाच कुटुंबात अनेक वीर जन्म घेतात.”

“सरस्वतीची कृपाही काही कुटुंबांवर अनेक पिढ्यांपर्यंत राहते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणं, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहे. आधी नानासाहेब, मग अप्पासाहेब आणि आता सचिन भाऊ आणि त्यांचे दोन भाऊ हा संस्कार पुढे नेत आहेत.”

देवेंद्र फडणवीस, मोदी आणि पद्म पुरस्कार, शाहांनी सांगितला किस्सा

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यांनी आग्रहाने मोदीजींना सांगितलं की, अप्पासाहेबांना पद्म पुरस्काराने सन्मानित करा. आणि भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं. महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार 1995 पासून… भाजप-शिवसेना सरकारने याची सुरूवात केली. महाराष्ट्र आणि देशसेवेत योगदान देणाऱ्या अनेक लोकांना हा पुरस्कार दिला गेला”, असं शाह यावेळी म्हणाले.

“पु.ल. देशपांडेपासून, स्वरकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, विजय भाटकर, रघुनाथ मार्शलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुलोचनाजी आणि एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जात आहे”, असं अमित शाह म्हणाले.

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!