Viral News: शिक्षिकेने फेसुबक, इंस्टावर शेअर केले बिकिनी फोटो, शाळेने…

मुंबई तक

Viral News: एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेने तिचे बिकिनीतील फोटो हे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तिच्यावर आता प्रचंड टीका होत आहे.

ADVERTISEMENT

female teacher shared bikini photos on facebook and instagram school administration gave signal for action
female teacher shared bikini photos on facebook and instagram school administration gave signal for action
social share
google news

Viral News: एका महिला शिक्षिकेला स्वत:चे बिकिनी फोटो (Bikini Photo) सोशल मीडियावर (Social Media) शेअर करणं आता बरंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या कृत्यामुळे तिला चक्क नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी होत आहे. लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ हे अश्लील असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिक्षिकेने आपला बचाव केला आहे. ट्रोल करणाऱ्यांनी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमधला फरक समजून घ्यायला हवा, असं महिला शिक्षिकेने म्हटलं आहे. हे प्रकरण कॅनडामधील आहे. (female teacher shared bikini photos on facebook and instagram school administration gave signal for action)

नेमकं प्रकरण काय?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, क्रिस्टिन मॅकडोनाल्ड असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. सोशल मीडियावर ती ‘मिस एवा जेम्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिस्टिनला शाळा व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणात आता अल्टिमेटम दिला आहे. जर तिने तिचे बिकिनीवरील फोटो पोस्ट करणे थांबवले नाही तर तिला काढून टाकले जाईल. असं स्पष्ट शब्दात शाळेच्या प्रशासनाने सांगितलं आहे.

यावर क्रिस्टिनने सांगितले की, ‘तिला शाळेच्या नोकरीतून मिळणारा पगार हा कमी आहे, त्यामुळे तिने अतिरिक्त उत्पन्नासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. पण यावर लोकं जो आक्षेप घेत आहे ते खरंच माझ्या समजण्यापलीकडचा आहे.’ क्रिस्टिन म्हणते की, ती शाळेच्या वेळेत या सर्व गोष्टी करत नाही. अशा परिस्थितीत नियम मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिने शालेय व्यवस्थापनाला याबाबत कठोर शब्दात सांगितले देखील आहे की ती यापुढे देखील तिचे बिकिनीमधील फोटो पोस्ट करत राहील.

हे वाचलं का?

    follow whatsapp