नागपूरमध्ये भरधाव SUV ची तीन बाईकना जोरदार धडक, ७० फूट खाली पडून एकाच कुटुंबातले चौघे ठार

नागपूर पोलिसांनी या प्रकरणात गणेश आढावला अटक केली आहे, तो दारू पिऊन गाडी चालवत असल्याने हा अपघात घडला
Four of a family were killed when a speeding SUV collided with three bikes in Nagpur, falling 70 feet from a flyover.
Four of a family were killed when a speeding SUV collided with three bikes in Nagpur, falling 70 feet from a flyover.

नागपूरच्या सक्करदरा भागात असलेल्या उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमधल्या या भीषण अपघातात एकाच दुचाकीवर चाललेल्या विनोद खापेकर, त्यांच्या वृद्ध आई लक्ष्मी खापेकर आणि दोन मुलं विवान आणि वेदांत या चौघांचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

Four of a family were killed when a speeding SUV collided with three bikes in Nagpur, falling 70 feet from a flyover.
पुणे-अहमदनगर महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातले पाच जण ठार

नेमकी नागपूरमध्ये काय घडली अपघाताची घटना?

शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास रेशीम बाग चौकाकडून दिघोरी चौकाकडे जाणाऱ्या महिंद्रा कारचा ताबा सुटला. या कारचा वेग प्रचंड होता. या कारने तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की तीनपैकी दोन दुचाकी या सक्करदरा पुलावरच पडल्या. मात्र तिसरी धडक ज्या दुचाकीला दिली ती जास्त भयंकर होती कारण यामुळे दुचाकी साधारण ७० फूट खाली फेकली गेली.

Four of a family were killed when a speeding SUV collided with three bikes in Nagpur, falling 70 feet from a flyover.
Accident On Pune Bangalore Highway: नौदल कर्मचाऱ्यासह एकाच कुटुंबातले पाच ठार

या अपघातात एकाच दुचाकीवर बसलेले चारजण खाली फेकले गेले. या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांना कार चालवणाऱ्या गणेश आढावला अटक केली आहे. गणेश आढाव दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर अनियंत्रित चारचाकी कारने तीन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघंजण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान एकाच कुटुंबातल्या या चौघांचाही मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in