‘रवी राणांना आवरा’; बच्चू कडू आक्रमक होताच गुलाबराव पाटलांनी फडणवीसांना केली प्रार्थना
सत्ताधारी बाकावरील दोन आमदार ‘५० खोके’च्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेत. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्ष सुरूये. या वादात शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतलीये. रवी राणांनी शब्द मागे घ्यावा, असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केलीये. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला राजकीय संघर्ष राज्यभरात पोहोचलाय. राणांविरुद्ध बच्चू […]
ADVERTISEMENT

सत्ताधारी बाकावरील दोन आमदार ‘५० खोके’च्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेत. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्ष सुरूये. या वादात शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतलीये. रवी राणांनी शब्द मागे घ्यावा, असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केलीये.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला राजकीय संघर्ष राज्यभरात पोहोचलाय. राणांविरुद्ध बच्चू कडू आक्रमक झालेत. त्यानंतर आता शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना राणांना खडेबोल सुनावलेत.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडलीये. “आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कुणी विकावू नाहीये. तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत”, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राणांवर निशाणा साधलाय.
बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये सुरू झालेल्या वादामागचं खरं कारण काय?