हॉटेलच्या उधारीसाठी भर रस्त्यात अडवलं, हॉटेल मालकाची सदाभाऊ खोतांसोबत हुज्जत
सांगोला: 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेली हॉटेलची उधारी द्या आणि मगच पुढं जा. असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने थेट माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची वाट अडवली. आज (16 जून) दुपारी पंचायत समितीच्या आवारातच माजी मंत्री सदाभाऊ खोत हॉटेल मालकाने अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर […]
ADVERTISEMENT

सांगोला: 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेली हॉटेलची उधारी द्या आणि मगच पुढं जा. असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने थेट माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची वाट अडवली.
आज (16 जून) दुपारी पंचायत समितीच्या आवारातच माजी मंत्री सदाभाऊ खोत हॉटेल मालकाने अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. हा सगळ्या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक शिनगारे हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते. निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदरमोड करून उधारीने जेवळाणी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत असल्याचा आरोप अशोक शिनगारे यांनी केला आहे.