Sangli: मामीने मांत्रिकाकडे नेलं, भाच्याचा जीवच गेला; असं घडलं तरी काय? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Sangli: मामीने मांत्रिकाकडे नेलं, भाच्याचा जीवच गेला; असं घडलं तरी काय?
बातम्या शहर-खबरबात

Sangli: मामीने मांत्रिकाकडे नेलं, भाच्याचा जीवच गेला; असं घडलं तरी काय?

innocent 14 year old boy dies after being beaten up by a exorcist a shocking incident in sangli

Sangli superstition Crime: प्रबोधिनी चिखलीकर, सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या (superstition) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. अनेक जण हे बुवाबाजीच्या नादाने अगदी निष्पाप मुलाच्या जीवावर उठले असल्याच्या देखील खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना आता सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावात घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण आहे. (innocent 14 year old boy dies after being beaten up by a exorcist a shocking incident in sangli)

भूत झपाटल्याचं म्हणत मांत्रिकाची मुलाला बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेपायी आर्यन दीपक लांडगे (वय 14 वर्ष) या मुलाला अत्यंत दुर्दैवीपणे आपला जीव गमवावा लागला आहे. आर्यनला मागील काही दिवसांपासून सतत ताप येत होता. त्यामुळे तो तापाच्या ग्लानीत सतत बडबडत होता. काही केल्या आर्यनचा ताप कमी होत होता. त्यामुळे आर्यनच्या मामीने त्याला तिच्या वडिलांने नेलं. जे स्वत: मांत्रिक असल्याची सांगायचे.

कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर यागावी तिचे वडील आप्पासाहेब कांबळे हे राहतात. ते भूतबाधा, करणी काढणे हा सगळा प्रकार करतात. त्यांनीच आर्यनला भूतबाधा झाली असून ती काढावी लागेल असे सांगितले होते. त्यामुळेच मामीने आर्यनला शिरगूर येथे नेलं. यावेळी भूतबाधा काढण्याच्या नावाखाली त्यांनी आर्यनला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली.

हे ही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

आप्पासाहेब कांबळेंनी केलेल्या या मारहाणीत आर्यन हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्यांनी तिथून त्याच्या आईला तात्काळ फोन केला. यावेळी आर्यनने रडतरडत आपल्या मारहाण झाली असून इथून घेऊन जा असं सांगितले. मुलाने केलेल्या फोननंतर त्याच्या आईने लागलीच आर्यनला शिरगूरवरून परत आणलं.

14 वर्षीय मुलाचा गेला हकनाक बळी

मारहाणीमुळे आर्यनची स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. त्यामुळे त्याची अवस्था पाहून त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण आर्यनला झालेली मारहाण ही एवढी गंभीर होती की, त्याचा त्याच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील आर्यनच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही.

अखेर 20 मे रोजी आर्यनचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आर्यनच्या शरीरावर अमानुष मारहाणीच्या खुणा देखील दिसत होत्या. मांत्रिकाने केलेल्या या मारहाणीमुळेच आर्यनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा >> James Marape : PM मोदींच्या पाया पडणारे पापुआचे PM अत्यंत चालाख, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच करतात!

दरम्यान, हा सर्व प्रकार समजताच मांत्रिक आप्पासाहेब कांबळे हा फरार झाला आहे. 14 वर्षीय शाळकरी मुलगा असलेल्या आर्यनचा असा मृत्यू झाल्याचे पाहून सांगलीच्या अंनिस शाखेच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व संबंधित व्यक्ती व मांत्रिकावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पण ही घटना कर्नाटकातीळ कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरगूर या गावी घडली असल्याने हा गुन्हा कुडची पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. आरोपी मांत्रिकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही अंनिसकडून केली जात आहे.

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!